वॉश्गिंटन,ता.24 मे : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन सोबत होणारी बहुप्रतिक्षित बैठक रद्द केली आहे. किम च्या ताज्या वक्तव्यामुळं ही बैठक रद्द करण्यात आल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
अध्यक्ष ट्रम्प यांनी बैठक रद्द करण्याबाबतचं पत्र किम ला लिहिल आणि त्यात सर्व कारणांचा उल्लेख केला. तुमच्या वक्तव्यामध्ये राग आणि शत्रुत्वाची भावना असल्यानं अशा वातावरणात चर्चा करणं शक्य नाही. तुमचं मन जेव्हा बदलेल तेव्हा पुन्हा चर्चा होऊ शकते असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. 12 जून ला सिंगापूर इथं ही चर्चा होणार होता.
The full letter from the President Trump to Chairman Kim Jong Un : https://t.co/RJD9qV0HSl pic.twitter.com/b0BEf0mKWf
Loading...— The White House (@WhiteHouse) May 24, 2018
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा