मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

भरधाव बसची ट्रेनला धडक, 17 प्रवाशांचा जागीच मृत्यू 30 जखमी

भरधाव बसची ट्रेनला धडक, 17 प्रवाशांचा जागीच मृत्यू 30 जखमी

मुसळधार पावसामुळे बस चालकाला ट्रेन दिसली नाही आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली असावी असं सांगितलं जात आहे.

मुसळधार पावसामुळे बस चालकाला ट्रेन दिसली नाही आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली असावी असं सांगितलं जात आहे.

मुसळधार पावसामुळे बस चालकाला ट्रेन दिसली नाही आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली असावी असं सांगितलं जात आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar

बँकॉक, 11 ऑक्टोबर : जगभरात कोरोनाचा विळखा एकीकडे अधिक घट्ट होत असताना मोठी दुर्घटना समोर आली आहे. भरधाव ट्रेन आणि बसची एकमेकांना धडक झाली आहे. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये 17 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 30 जण जखमी आहेत. 65 प्रवाशांना घेऊन बस जात असताना अचानक ट्रेननं धडक दिली अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. ही घटना थायलंडमध्ये घडल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चाचेओंगसाओ परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. पावसाचा जोर वाढल्यानं समोरचं सगळं अंधुक दिसत होतं. त्यामुळे बस चालकाला समोरून ट्रेन येत असल्याचं समजलं नाही आणि हा अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे. ही बस रेल्वे लाईन क्रॉस करत असताना रेल्वेनं अचानक बसला धडक दिली आणि मोठी दुर्घटना घडली. बँकॉकपासून 80 किलोमीटर अंतरावर पूर्व भागात ही घटना घडली.

हे वाचा-एकमेकांवर विमानं आदळल्यामुळे 5 जणांचा मृत्यू; हवेतच झाले दोन तुकडे

चाचेओंगसाओ जिल्हा मुख्य अधिकारी पृथुआंग युकासेम यांनी थायलंडमध्ये स्थानिक मीडियाला दिलेल्या माहितीनुसार या अपघातात 17 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 30 प्रवासी जखमी झाले आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, आपत्कालीन विभाग आणि यंत्रणा कामाला लागली असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलं आहे. मुसळधार पावसामुळे बस चालकाला ट्रेन दिसली नाही आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली असावी असं सांगितलं जात आहे.

First published:

Tags: Road accident, Train accident