05 एप्रिल : सिरियाच्या वायव्येकडील ईदबिल प्रांतात काल (मंगळवारी) झालेल्या रासायनिक हल्ल्यात 100 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. तसंच ४०० हून अधिक जण रासायनिक हल्ल्याने बाधित झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करावे लागले.
सिरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन राइट्सने दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या खान शेखौन शहरात झाला. रशिया आणि सिरिया फौजांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली. गुदमरल्यामुळे अनेक लोन बेशुद्ध पडले. सिरिया सरकारने रासायनिक वायू हल्ल्यांचे नेहमीच खंडन केले आहे. वैद्यकीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसाल, विषारी वायूने लोक ग्रस्त आहेत. श्वसनाचा त्यांना त्रास होत आहे. अनेक जण श्वास घेता येत नसल्याने बशुद्धवस्थेत पडले आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा