धक्कादायक! कोरोना वॉरिअर बनून रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरनं केली आत्महत्या

धक्कादायक! कोरोना वॉरिअर बनून रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरनं केली आत्महत्या

गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचं काम करणाऱ्या डॉक्टरांनी केली आत्महत्या.

  • Share this:

वॉशिंग्टन, 28 एप्रिल : जगभरात कोरोनानं थैमान घालत आहे. अशा परिस्थितीत सध्या वैद्यकिय कर्मचारी कोरोना वॉरिअर बनून रुग्णांवर उपचार करत आहेत. मात्र अमेरिकेतील मॅनहॅटनमधील (Manhattan hospital) सर्वात मोठ्या हॉस्पिटलच्या टॉम डॉक्टरांनी रविवारी आत्महत्या केली. या आत्महत्यनं सर्वांना धक्का बसला आहे. 49 वर्षीय डॉक्टर लॉरेन एम ब्रीन (Dr. Lorna M. Breen) आपतकालीन विभागाच्या विभागाचे वैद्यकीय संचालक होत्या. गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचं काम त्या करत होत्या.

लॉरेन यांच्य मृत्यूमुळं रुग्णालय प्रशासनाला सगळ्यात मोठा धक्का बसला आहे. लॉरेन आपल्या कुटुंबासोबत राहत होत्या. त्यांनी आपल्या राहत्या घरीच आत्महत्या केली. डॉक्टर लॉरेनच्या वडिलांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले की, त्यांची मुलगी मॅनहॅटन शहरातील न्यूयॉर्क-प्रेस्बेटीरियन अॅलन हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागाच्या वैद्यकीय संचालक होती आणि तिने रविवारी शेरलॉट्सविले येथे घरात आत्महत्या केली. शेरॉट्सविले पोलीस विभागाचे प्रवक्ते टायलर हॉन यांनी सांगितले की, रविवारी लॉरेन यांच्या घरून आपत्कालीन नंबरवर कॉल आला आणि नंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र रुग्णालयात पोहचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

वाचा-'आम्ही कोरोनातच का नाही मेलो', महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचं भयाण वास्तव समोर

लॉरेन मानसिकदृष्ट्या स्वस्थ होत्या

लॉरेनच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार ती कोरोना संसर्ग प्रकरणानंतर मानसिकदृष्ट्या निरोगी होती आणि देशातील आघाडीच्या आरोग्य कर्मचार्‍यांसोबत काम करत होती. मात्र लॉरेनच्या वडिलांनी सांगितले की गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे तिला काळजी वाटत होती. त्याने सांगितले की लॉरेनने यापूर्वी त्यांच्याशी चर्चा केली आहे आणि रुग्णवाहिकेतून आणीबाणीच्या कक्षात नेताना काही कोरोनाचा संसर्ग कसा झाला त्याबद्दल ते सांगत होते. दरम्यान, लॉरेनवर कामाचा दबाव होता. दरम्यान कामाच्या दबावातून लॉरेन यांनी हे पाऊल उचलले असल्याची शक्यता आहे.

वाचा-मुंबईहून 1600 किमी चालत गाठलं घर, क्वारंटाइन केल्यानंतर 6 तासांतच...

हॉस्पिटलनं सांगितले लॉरेन एक हिरो

लॉरेन काम करत असलेल्या हॉस्पिटलमधून एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. यात डॉक्टर लॉरेन ब्रेन हीरो होती असे नमुद करण्यात आले आहे. तसेच, आमचे संपूर्ण लक्ष त्यांचे कुटुंब, मित्र आणि सहकारी यांना मदत करणे आणि त्यांचे दुःख कमी करणे यावर आहे. जगभरातील हा एक अतिशय कठीण काळ आहे. दरम्यान, लॉरेन यांचा मृत्यू कसा झाला याबद्दल माहिती देण्यास पोलिसांनी किंवा रुग्णालयाने नकार दिला आहे.

वाचा-ज्याचं कोणी नाही त्याची शिवसेना! बेवारस मृतदेहावर आमदारानं केले अंत्यसंस्कार

First published: April 28, 2020, 1:12 PM IST

ताज्या बातम्या