11 जून : डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग ऊन यांची शिखर परिषद उद्या सिंगापूरमध्ये पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी साडे सहा वाजता ही भेट होणार आहे. सिंगापूर वेळेनुसार सकाळी 9 वाजता दोन्ही नेते पहिल्यांदा भेटतील.
अवघ्या जगाचं लक्ष या भेटीकडे लागलंय. अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये विकोपाला गेलेले मतभेद दोघं सोडवू शकतील. किमान त्या दिशेनं पाऊलं टाकतील, की दोघांची व्यक्तिमत्त्व पाहता प्रश्न चिघळतील, अशा विविध शक्यतांवर जगभरात चर्चा सुरूय.
या भेटीबाबतचे काही प्रमुख मुद्दे
बहुप्रतीक्षित, ऐतिहासिक अशी ही भेट आहे
एकमेकांना नष्ट करण्याच्या धमक्या देणारे समोरासमोर भेटणार
जास्त अपेक्षा ठेवू नका, ट्रम्प यांचं विधान
किमला जाणून घेणं भेटीचा हेतू - ट्रम्प
उत्तर कोरियावर सध्या अनेक निर्बंध
निर्बांधामुळे उ. कोरियाची अर्थव्यवस्था कोलमडली
निर्बंध उठवले जाणे किम जाँगसाठी महत्वाचं
अमेरिकाला भेटीस भाग पाडलं, किमला द्यायचा आहे संदेश
पण किम अण्वस्त्र पूर्णपणे नष्ट करणार ?
किमवर विश्वास ठेवणं जगासाठी शक्य ?
ट्रम्प यांचा स्वभाव पाहता तोडगा निघू शकेल ?
ट्रम्पना भेटणं चीनला पसंत पडेल ?
50 वर्षांपासून अधिक काळ सुरू असलेलं युद्ध संपेल ?
युद्ध संपवण्याच्या करारावर चीन स्वाक्षरी करेल ?
किमला भेटून ट्रम्पना चीनचं महत्व कमी करायचं आहे का ?
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा