'कोरोना'चा हाहाकार; ऑलिम्पिक ते आयफोनवर व्हायरसचं सावट, हजारो लोकांच्या नोकऱ्याही धोक्यात

'कोरोना'चा हाहाकार; ऑलिम्पिक ते आयफोनवर व्हायरसचं सावट, हजारो लोकांच्या नोकऱ्याही धोक्यात

चीननंतर (China) जपानमध्ये (Japan) कोरोनाव्हायरसने (Coronavirus) आपले हातपाय पसरलेत आणि या कोरोनाव्हायरसच्या भीतीचं सावट जपानची राजधानी टोकियोत होणाऱ्या ऑलिम्पिकवर (Tokyo olympics 2020) आहे.

  • Share this:

टोकियो, 23 फेब्रुवारी : 4 वर्षांतून एकदाच होणारं ऑलिम्पिक (olympics) म्हणजे खेळांचा महाकुंभ जो संपूर्ण जगाला जोडतो. मात्र हा खेळ आता धोक्यात आहे आणि धोका म्हणजे दुसरं काही नाही तर संपूर्ण जग ज्याच्या दहशतीत आहे तो कोरोनाव्हायरस (Coronavirus). चीननंतर (China) जपानमध्ये (Japan) कोरोनाव्हायरसने आपले हातपाय पसरलेत आणि या कोरोनाव्हायरसच्या भीतीचं सावट जपानची राजधानी टोकियोत होणाऱ्या ऑलिम्पिकवर (Tokyo olympics 2020) आहे.

24 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत टोकियो ऑलिम्पिक होणार आहे. म्हणजे ऑलिम्पिकला फक्त 5 महिने उरलेत. ऑलिम्पिक आयोजित समितीने गेम्सचं ऑफिशिअल मोटो – युनायटेड बाय इमोशन्स रिलीज केलं. मात्र संपूर्ण जग सध्या ज्या इमोशनमध्ये आहे, ती भीती. जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाव्हायरसची भीती आणि त्याचा परिणाम ऑलिम्पिकवर होऊ शकतो. कोरोनाव्हायरसमुळे ऑलिम्पिक रद्द होऊ शकतं.

जपानमध्ये तब्बल 695 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, यातील सर्वाधिक रुग्ण डायमंड प्रिन्सेस क्रुझवरील (Dimond princess cruise) प्रवासी आणि क्रू मेंबर्स आहेत. योकोहामा बेसबॉल स्टेडियमवर ऑलिम्पिकचं मुख्य कार्यक्रम होणार आहे आणि याच ठिकाणापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर हे जहाज उभं आहे. त्यामुळे कोरोनाव्हायरसची परिस्थिती पाहता टोक्यो ऑलिम्पिक रद्द होऊ शकतं किंवा पुढे ढकललं जाऊ शकतं.

हेदेखील वाचा - ‘त्या’ जहाजावरील भारतीयांचा जीव धोक्यात, आणखी 4 जणांना झाला 'कोरोना'

जपानच्या स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनाव्हायरसमुळे ऑलिम्पिक प्रभावित होऊ शकतं. आयोजकांनी सांगितलं की, ऑलिम्पिक वॉलेंटियर्सची ट्रेनिंग सध्या रद्द करण्यात आलं आहे. मात्र ट्रेनिंगचं शेड्युल नंतर ठरवण्यात येईल.

जपानच्या सरकारी वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, टोक्यो ऑर्गेनायझिंग कमिटीचे सीईओ तोसिरो मुटो यांनीदेखील कोरोनाव्हायरसमुळे ऑलिम्पिकवर कोरोनाव्हायरसचा परिणाम होऊ शकतो. असं झाल्यास क्रीडा क्षेत्राला हा सर्वात मोठा झटका असेल.होणाऱ्या या ऑलिम्पिकसाठी जपानने लाखो डॉलर्स खर्च केलेत, त्यामुळे जपानच्या अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो.

हेदेखील वाचा - माझ्या मुलीला वाचवा! भरसमुद्रात अडकली महाराष्ट्राची लेक; PM ना बाबांचं साकडं

आयफोनचा (iphone) तुटवडा

अॅपलने आपल्या गुंतवणूकदारांना पहिल्या तिमाहीत नुकसान होण्याची शक्यता वर्तवली आहे.  कोरोनाव्हायरसमुळे बहुतेक चीनी फॅक्ट्री बंद झाल्यात, यामुळे कित्येक देशांमध्ये आयफोनचा तुटवडा भासू शकतो.

जगातील सर्वात मोठं कार प्लांट बंद, नोकऱ्या धोक्यात

चीननंतर दक्षिण कोरियामध्ये कोरोनाव्हायरस झपाट्याने पसरतो आहे. आतापर्यंत देशात 556 रुग्ण आढळलेत, तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण कोरियातील उल्सानमध्ये हुंडईचं कार प्लांट आहे. जहातील सर्वात मोठं प्रोडक्टिव्ह असं कार प्लांट आहे. दर वर्षी 1.40 कोटी कारची क्षमता आहे. द. कोरियामध्ये 25 हजार पेक्षा जास्त लोकांना सक्तीची रजा देण्यात आली आहे.

First published: February 23, 2020, 4:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading