Home /News /videsh /

Tokyo Olympic : जपानमध्ये कोरोनाचा कहर, जपान सरकारने केली आणीबाणीची घोषणा

Tokyo Olympic : जपानमध्ये कोरोनाचा कहर, जपान सरकारने केली आणीबाणीची घोषणा

Tokyo Olympic 2020 जपान सरकारने कोरोना व्हायरसच्या (Corona Virus Japan) वाढत्या रुग्णांमुळे 31 ऑगस्टपर्यंत आणीबाणी (Emergency) लागू केली आहे.

    टोकयो, 31 जुलै : जपान सरकारने कोरोना व्हायरसच्या (Corona Virus Japan) वाढत्या रुग्णांमुळे 31 ऑगस्टपर्यंत आणीबाणी (Emergency) लागू केली आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जपान सरकारने हा निर्णय घेतला आहे. आणीबाणी टोकयो, सैतामा, चिबा, कानागावा, ओसाका आणि ओकिनावामध्ये लागू करण्यात आली आहे. या राज्यांशिवाय होक्काइडो, इशिकावा, क्योटो, ह्योगो आणि फुकुओका या प्रांतांमध्येही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सध्या टोकयोमध्ये ऑलिम्पिक (Tokyo Olympics 2020) स्पर्धा सुरू आहे. जगभरातले हजारो खेळाडू वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेण्यासाठी टोकयोमध्ये आहेत. जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट करत आणीबाणी लागू करण्याबाबतची घोषणा केली आहे. टोकयो आणि ओकिनावामध्ये पहिल्यापासूनच आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. ही आणीबाणी 22 ऑगस्टला संपणार आहे. जपानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार देशात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे आणीबाणीचा निर्णय घेण्यात आला आहे. टोकयो शहरातल्या सरकारने दिलेल्या माहितीनुसार 29 जुलैला 3,865 नवे रुग्ण आढळले, तर संपूर्ण देशात 10,699 कोरोना रुग्ण सापडले होते. महामारी सुरू झाल्यानंतर हे दोन्ही आकडे सर्वाधिक आहेत. सरकार कोरोनाला रोखण्याचे प्रयत्न करत आहे, पण संक्रमण कमी व्हायची गती कमी होत नाही. टोकयो आणि ओकिनावामध्ये लावण्यात आलेले निर्बंध ऑलिम्पिक आणि ओबोन हॉलीडे लक्षात घेऊन लावण्यात आले आहेत. टोकयोमध्ये ऑलिम्पिकनंतर पॅरालिंपिकचं (Paralympic) आयोजन करण्यात येणार आहे. 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Coronavirus, Japan, Olympics 2021

    पुढील बातम्या