मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

साप चावल्याने भडकली 2 वर्षीय चिमुकली; बदला घेण्यासाठी सापालाच कचाकचा चावली, पुढं जे घडलं ते धक्कादायक

साप चावल्याने भडकली 2 वर्षीय चिमुकली; बदला घेण्यासाठी सापालाच कचाकचा चावली, पुढं जे घडलं ते धक्कादायक

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

या घटनेत साप चावल्यानंतर मुलगी ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून शेजारी राहाणारे लोक तिथे पोहोचले. मात्र, यानंतर जे दृश्य दिसलं, ते पाहून सगळेच हैराण झाले. (Toddler Bites Snake to Death)

  • Published by:  Kiran Pharate
मुंबई 14 ऑगस्ट : साप पाहून भल्या-भल्यांची अवस्था बिकट होते. मात्र, एका चिमुकलीने सापासोबत जे काही केलं, ते अतिशय धक्कादायक होतं. या घटनेत आधी सापाने मुलीला चावा घेतला, त्यानंतर मुलीला इतका राग आला की तिने सापाला दातांनी चावलं. ही घटना तुर्कीमधील एका गावातील आहे. रक्षाबंधनाला बहिणीला भेटवस्तू देण्यासाठी भावाचा मालकाच्या घरात डल्ला, नागपुरातील धक्कादायक घटना या घटनेत साप चावल्यानंतर मुलगी ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून शेजारी राहाणारे लोक तिथे पोहोचले. मात्र, यानंतर जे दृश्य दिसलं, ते पाहून सगळेच हैराण झाले. कारण या चिमुकलीने आपल्या दाताखाली एक अर्धा मीटर लांब साप पकडलेला होता. यासोबतच या मुलीच्या चेहऱ्यावर आणि ओठावर सापाने चावा घेतल्याच्या खुणाही होत्या. हे पाहून शेजाऱ्यांनी तात्काळ मुलीला सापापासून वेगळं केलं आणि तिला रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात तिला 24 तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं. 'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, रुग्णालयात मुलीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं. हे प्रकरण 10 ऑगस्टचं आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 200 ml पेट्रोल प्यायला अन् कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरुन मारली उडी; नागपूरातील BCA च्या विद्यार्थ्याचा मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार, खेळता खेळता हा साप मुलीच्या जवळ पोहोचला. तेव्हा ती मुलगी खेळणं समजून सापासोबत खेळू लागली. यादरम्यान सापाने मुलीच्या ओठांना चावा घेतला. यानंतर भडकलेल्या मुलीनेही दातांनी सापाला चावलं. या घटनेत सापाचा मृत्यू झाला. सापाचे जवळपास दोन तुकडे झाले होते. रिपोर्टनुसार, घटनेच्या वेळी मुलीचे वडील कामावर होते. जेव्हा त्यांना हे सगळं समजलं तेव्हा त्यांना धक्का बसला. मात्र, या सगळ्या प्रकरणानंतरही मुलगी सुखरूप असल्याने, तिला देवानेच वाचवलं असं ते म्हणाले.
First published:

Tags: Shocking news, Snake

पुढील बातम्या