भारत आणि इस्रायलमध्ये महत्त्वाचे द्विपक्षीय करार

भारत आणि इस्रायलमध्ये महत्त्वाचे द्विपक्षीय करार

कृषी आणि संरक्षणविषयक करारांवर आज स्वाक्षऱ्या होणार आहेत.

  • Share this:

05 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्रायल दौरा अनेक अर्थांनी वैशिष्टपूर्ण ठरत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्यात आज महत्त्वाचे करार होणार आहेत. कृषी आणि संरक्षणविषयक करारांवर आज स्वाक्षऱ्या होणार आहेत. काल मोदींचं विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं. दरम्यान 26 /11 च्या हल्ल्यात वाचेलेल्या मोशे आणि त्याच्या आजीची भेट आज मोदी घेणार आहेत.

कसा असेल पंतप्रधानांचा आजचा कार्यक्रम ?

1 वाजता - राष्ट्रपती भवनात इस्त्रायलचे राष्ट्रपती रेयूवेन रिवलिन यांची भेट

2 वाजता - इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी विशेष भेट

4:30 वाजता - दोन्ही पंतप्रधानांकडून संयुक्त निवेदन

5:05 ते 5:15 - मोशे आणि त्याच्या कुटुंबियांशी विशेष भेट

7 वाजता - विरोधी पक्षनेत्यांशी भेट

7:30 वाजता - पीबीएस पुरस्कार विजेत्यांशी भेट

7:40 वाजता - डॉ . भारत बराई आणि त्यांच्या शिष्टमंडळाशी भेट

8 वाजता - नेतान्याहू यांच्यासोबत इस्त्रायल संग्रहालयाला भेट

10:20 वाजता - परदेशस्थ भारतीयांशी भेट

10:30 वाजता - तेल अवीवमध्ये भारतीय समुदायाशी संवाद

First published: July 5, 2017, 9:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading