Tiktok चा नाद जिवावर उठला! अतरंगी VIDEO करताना स्वतःवरच केलं शूट

Tiktok चा नाद जिवावर उठला! अतरंगी VIDEO करताना स्वतःवरच केलं शूट

भारतामध्ये टिकटॉक (TikTok) या चायनीज अॅपवर बंदी आहे. पण टिकटॉकसाठी अतरंगी VIDEO करण्याच्या नादात जीव गेल्याची एक घटना मेक्सिकोमध्ये घडली. वाचा नेमकं काय झालं.

  • Share this:

मॅक्सिको सिटी, 08ऑक्टोबर: जगभरात TikTok  हे अ‍ॅप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. भारतात या सोशल मीडिया टीकटॉकवर बंदी आहे. मात्र इतर अनेक देशांमध्ये अजूनही हे अ‍ॅप वापरले जाते. मेक्सिकोमध्ये या अ‍ॅवर व्हिडीओ तयार करत असताना एक भयंकर घटना घडली आहे.  मेक्सिकोमधील चिहुहुआ राज्यात ही घटना घडली आहे. इथे व्हिडीओ तयार करत असताना गोळी लागल्याने एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. या 20 वर्षीय तरुणीचे 10 साथीदार तिला किडनॅप करत आहेत, असा व्हिडीओ तयार करण्यात येत होता. पण हा व्हिडीओ तयार करत असताना चुकून गोळी लागून या तरुणीचा यामध्ये मृत्यू झाला आहे.

अरेलिन मार्टिन्ज असे या तरुणीचं नाव असून एका छोट्या फार्म हाऊसमध्ये हा व्हिडीओ शूट करण्यात येत होता. यामध्ये या महिलेचे हात बांधण्यात आले होते. त्याचबरोबर डोळ्यावर पट्टीदेखील बांधण्यात आली होती, ज्या मुलीला किडनॅप केलं जाणार होतं त्या तरुणीच्या शेजारी तिच्या आईला बसवण्यात आलं होतं. त्याचबरोबर दुसऱ्या व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला असं दाखवल्याचा त्यांचा प्रयत्न होता. या सगळ्या गोंधळामध्ये गोळी मारणाऱ्या व्यक्तीच्या हातून खरंच ट्रिगर दाबला गेला आणि तरुणीचा मृत्यू झाला असा अंदाज आहे. या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर व्हिडीओ तयार करणाऱ्या इतर व्यक्तींनी तेथून पळ काढला.

या घटनेविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या 10 जणांमधील एका व्यक्तीनेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली.ही घटना घडल्यानंतर तो व्यक्तीसुद्धा तिथून पळून गेला. त्यानंतर आता पोलीस या घटनेचा तपास करत असून या 10 जणांचा देखील शोध घेत आहेत. या घटनेविषयी बोलताना चिहुहुआ राज्याचे अटर्नी जनरल म्हणाले, यामध्ये दोषी असणाऱ्या व्यक्तींना शिक्षा मिळणार आहे. त्याचबरोबर या व्यक्तींकडे हत्यारं कुठून आली याचा देखील तपास केला जाणार आहे. लवकरच याचा तपास लागेल असा विश्वास देखील पोलिसांनी व्यक्त केला.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 8, 2020, 11:38 PM IST

ताज्या बातम्या