तिहेरी तलाकवर 14 देशांमध्ये बंदी, आता भारत ठरणार 15 वा देश !

तिहेरी तलाकवर 14 देशांमध्ये बंदी, आता भारत ठरणार 15 वा देश !

अनेक देशांनी तिहेरी तलाकवर बंदी आणली आहे ज्यातील बरीच राष्ट्रं ही मुस्लीम बहुल आहेत.

  • Share this:

28 डिसेंबर: एेतिहासिक तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयकाला आज लोकसभेत एकमताने मंजुरी देण्यात आलीये. याआधी अनेक देशांनी तिहेरी तलाकवर बंदी आणली आहे ज्यातील बरीच राष्ट्रं ही मुस्लीम बहुल आहेत.

1. पाकिस्तान-जगात दुसरा सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेला देश म्हणजे पाकिस्तान. पाकिस्तानमध्ये 1961 साली तिहेरी तलाकवर बंदी आणण्यात आली.

तिथे जर तिहेरी तलाक द्यायचा असेल तर चेअरमन ऑफ युनियन काउन्सिलला नोटिस द्यावी लागते. नंतर काउन्सिल पती-पत्नींमध्ये समझोता करायचा प्रयत्न करते. नंतर 90 दिवसाचा वेळ दिला जातो. त्यानंतरही समझोता न झाल्यास तलाक मंजूर केला जातो.

2. अल्जेरिया- 3.50 कोटी मुस्लिम लोकसंख्या असलेल्या या देशातही तिहेरी तलाकवर बंदी आहे. जर घटस्फोट हवा असेल तर कोर्टात जावं लागतं. समझोत्यासाठी काही काळ दिला जातो. नंतर कोर्टाच्या नियमांनुसार घटस्फोट होतो.

3.इजिप्त - या देशात 1929 सालीच तिहेरी तलाकवर बंदी आणण्यात आली. या देशात पती- पत्नीला मासिक पाळी चालू असताना तीन महिन्यात वेगवेगळ्या वेळी एकामेकाला तलाक म्हणावं लागतं. ही एक त्रिस्तरीय प्रक्रिया आहे. यात तलाक म्हटल्यानंतर 90 दिवस थांबावं ही लागतं.

4.ट्युनिशिया -या देशात 1956 सालीच तिहेरी तलाकवर बंदी आणण्यात आली. इथे आता कोर्टाच्या प्रक्रियेनेच घटस्फोट घेतला जातो.

5. बांग्लादेश- 1971 साली जन्माला आलेलं हे छोटसं राष्ट्र. 1971 सालापासूनच बांग्लादेशमध्ये तिहेरी तलाकला मान्यता नाही.

6. इंडोनेशिया- 20 कोटीहून जास्त मुस्लीम लोकसंख्या असलेला हा देश .या देशात जगातील सर्वाधिक मुसलमान राहतात. पण या देशात तिहेरी तलाक मंजूर नाही. घटस्फोट घेण्यासाठी कोर्टाच्या प्रक्रियेचंच पालन करावं लागतं

7. श्रीलंका- या देशातही तिहेरी तलाकास मान्यता नाही. जर तलाक हवा असेल तर मुस्लीम जजला नोटिस द्यावी लागते. त्यानंतर दोन्ही कुटुंब आणि पती पत्नीमध्ये समझोता करण्याचे प्रयत्न केले जातात. 90 दिवसांचा नोटिस पिरेड दिला जातो. त्यानंतर समझोता न झाल्यास घटस्फोट दिला जातो.

8.तुर्कस्थान- या देशात स्विस सिव्हिल कोड 1926 पासून लागू आहे. या कायद्याच्या प्रक्रियेचं घटस्फोट घेताना पालन केल्यानंतर तिहेरी तलाक दिला जाऊ शकतो.

9. सायप्रस- येथे तिहेरी तलाक कायदेशीर प्रक्रियेनेच घेतला जातो.

10. इराक-इथे फक्त पतीने तलाक म्हणून चालत नाही. पत्नीनेही म्हणावं लागतं. आणि या दोघांच्या भांडणाची चौकशी कोर्ट करतं. नंतर अंतिम निर्णय कोर्ट देतं.

11. सुदान- काही कायदेशीर नियमांनुसार तिहेरी तलाक दिला जातो.

12.मलेशिया- इथे लग्न आणि घटस्फोट न्यायालयाच्या अधीन आहे. घटस्फोट घ्यायचा असेल तर त्याचं कारण कोर्टाला सांगावं लागतं. आणि ते मंजूर झाल्यासच घटस्फोट मंजूर होतो.

13 इराण-इथे शिया कायद्या अंतर्गत तिहेरी तलाकवर बंदी आहे.

14 सीरिया- 74 टक्के लोकसंख्या सुन्नी पंथाची असलेल्या या देशात 1953 पासूनच तिहेरी तलाकवर बंदी आहे.

आता भारताचाही या देशांच्या यादीत समावेश होणार आहे. तिहेरी तलाकवर बंदी असलेला भारत हा 15 वा देश ठरणार आहे.

First published: December 28, 2017, 8:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading