रशियातील भीषण वादळामुळे तिघांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO आला समोर

रशियातील भीषण वादळामुळे तिघांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO आला समोर

रशियात झालेल्या या भयावह वादळात मोबाइल टॉवरही कोसळल्याचा व्हिडीओ समोर आला आहे

  • Share this:

मॉस्को, 26 मे : रशियातील (Russia) उरल भागातील एकतेरिनबर्गमध्ये सोमवारी भीषण वादळ आलं. ज्यामुळे शहरात मोठी वित्तहानी झाली. या वादळात अनेक घरांचे छप्पर उडून गेलं. मोबाइल टॉवरही कोसळला. या वादळात तिघांचा मृत्यू झाला आहे.

या जबरदस्त वादळाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. एका व्हिडीओत तर जोरदार वाऱ्यामुळे एका घराचे छत उडून माणसावर पडलं आहे. रशियन टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये तर इमारतीच्या छतावर लावलेला मोबाइल ट़ॉवर कोसळत असल्याचे दिसून आले.

एकतेरिनबर्ग रशियातील चौथा सर्वात मोठं शहर आहे आणि याला उद्योगाचे केंद्रही मानले जाते. या वादळामुळे अनेक झाडं रस्त्यांवर पडली असून यामुळे रस्त्यांवर वाहतूक व्यवस्था खोळंबली आहे. आधीच जगभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. यामध्ये लाखोंना कोरोनाची लागण झाली असून मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. अशातच नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

हे वाचा -EXCLUSIVE सोनू सूद : संकटकाळात हजारो मजुरांना मदतीचा हात देणारा Real Hero

धक्कादायक! राज्यात 24 तासात 80 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, 2 जणांचा मृत्यू

 

 

 

 

First published: May 26, 2020, 4:04 PM IST
Tags: in Russia

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading