Home /News /videsh /

बापरे! या व्यक्तीचे 98 टक्के शरीर केसांनी झाकलेले, चेहऱ्यावरही केसांचं जाळं; काय आहे कारण?

बापरे! या व्यक्तीचे 98 टक्के शरीर केसांनी झाकलेले, चेहऱ्यावरही केसांचं जाळं; काय आहे कारण?

शरीरासोबत त्यांचा संपूर्ण चेहराही केसांनी आच्छादलेला आहे.

    नवी दिल्ली, 18 मे : जगात अनेक चमत्कारिक गोष्टी पाहायला मिळतात. काही लोक प्रमाणापेक्षा अधिक उंच असतात तर काही लोक बुटके असतात. एखाद्या व्यक्तीला जन्मतःच एखादा अवयव अतिरिक्त असतो. अशा काही विचित्र समस्या असतात, ज्या जगात फक्त काही लोकांनाच असतात. कधीकधी या विचित्र समस्या संबंधित व्यक्तीला इतरांपेक्षा वेगळं बनवण्याचं काम करतात. लॅरी गोमेज (Larry Gomez) अशाच एका विचित्र समस्येनं त्रस्त आहेत. लॅरी यांना पाहताच लोकांची भीतीने गाळण उडते. लॅरी यांना पाहताच लोक अक्षरशः पळून जातात. अनेक वर्षानंतर लॅरी आता त्यांच्या समस्येसोबत जगायला शिकले आहेत. अमेरिकेतील कॅलिफोर्नियातले (California) लॅरी गोमेज ही जगातली एकमेव व्यक्ती आहे, ज्यांचे 98 टक्के शरीर केसांनी झाकलेलं आहे. शरीरासोबत त्यांचा संपूर्ण चेहराही केसांनी आच्छादलेला आहे. त्यामुळे लॅरी हे वुल्फमॅन (Wolfman) या नावाने प्रसिद्ध आहेत. प्रमाणापेक्षा अधिक केस वाढणं ही कुटुंबाची अनुवांशिक समस्या (Genetic problems) आहे. जन्मापासूनच संपूर्ण शरीरावर आहेत केस यापूर्वी लॅरी यांनी सर्कशीत कलाकार म्हणून काम केलं आहे. शरीरावरील अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. परंतु, त्यांना यश आलं नाही. लॅरी यांना जन्मतः हायपरट्रिचोसिस (Hypertrichosis) नावाचा दुर्मीळ आजार आहे. त्यामुळे शरीरावर केसांची जास्त वाढ होते. या आजारामुळे त्यांचा चेहराही केसांच्या जाड थराने झाकून गेलेला आहे. सर्वांत विचित्र बाब म्हणजे लॅरी यांच्या कुटुंबातले अन्य काही सदस्य वेलफेअर सिंड्रोम (Welfare Syndrome) नावाच्या अनुवांशिक आजाराने त्रस्त आहेत. हा आजार जगभरात 100 पेक्षा कमी लोकांमध्ये आढळतो. त्यात या कुटुंबाचा समावेश आहे. लॅरी यांचा सर्वांत जास्त केस असलेली व्यक्ती म्हणून काही निवडक लोकांमध्ये समावेश होतो. तसंच यासाठी त्यांना Worlds Hairiest Man हा किताब देखील मिळालेला आहे. आपली त्वचा स्वीकारण्याची प्रेरणा देतात लॅरी प्रत्येक जण लॅरीकडं विचित्र दृष्टिकोनातून पाहतो. लोकांकडून लॅरीला चांगली वागणूक मिळत नाही. कदाचित माझी पत्नी ही माझ्या आयुष्यातील पहिली व्यक्ती होती की, जिनं कधीच एक्स्ट्रिम हेयर ग्रोथ लूक वरून (Extreme Hair Growth Look) माझी पारख केली नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. एका घराच्या शोधात असताना या दोघांची भेट झाली होती. त्यानंतर लवकरच दोघांनी एकमेकांचे जोडीदार बनण्याचा निर्णय घेतला. ते इतरांना आपली त्वचा, आपलं व्यक्तिमत्व स्वीकारण्याबाबत प्रेरित करतात. तसंच या गोष्टींशी संबंधित अनुभव, गोष्टीदेखील सांगतात. वुल्फमॅनशी संबंधित त्यांचे ज्ञान आणि गोष्टी इतरांना सांगण्याकरिता त्यांनी यूट्यूबची मदत घेतली. तसंच ते ‘विझार्ड ऑफ ऑड टीव्ही’ नावाच्या चॅनेलवरही झळकले होते.

    First published:

    Tags: Woman hair

    पुढील बातम्या