'प्लीज McDonald'sमधून ऑर्डर करा'; बर्गर किंगने मॅकडोनाल्डसाठी जोडले हात

ट्विटरवर नेटिझन्सकडून अफाट प्रेम आणि आदर मिळवून बर्गर किंगचं हे ट्विट काही वेळातच व्हायरल झालं आहे.

ट्विटरवर नेटिझन्सकडून अफाट प्रेम आणि आदर मिळवून बर्गर किंगचं हे ट्विट काही वेळातच व्हायरल झालं आहे.

 • Share this:
  लंडन, 3 नोव्हेंबर : कोरोना व्हायरसमुळे (coronavirus) जगभरातील सर्व व्यवसायांवर विपरित परिणाम झाला आहे. आता अनलॉक प्रक्रियेत अनेक गोष्टी सुरू होत आहेत, परंतु त्याला तितकासा प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे. हेच पाहता आता अमेरिकेच्या फास्ट-फूड चेन बर्गर किंगच्या (burger King) एका आवाहनाने लोकांना चकित केलं आहे. बर्गर किंगने लॉकडाऊनमध्ये टिकून राहण्यासाठी आपल्या प्रतिस्पर्धी असलेल्या मॅकडोनाल्डला मदत करण्यासाठी आवाहन केलं आहे.‘मॅकडोनाल्डसमधून पदार्थ खरेदी करा’असं आवाहन बर्गर किंगने आपल्या ग्राहकांना केलं आहे.

  (वाचा - Airtel युजर्ससाठी कंपनीची घोषणा; आता फ्रीमध्ये मिळणार ही सुविधा)

  सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे बर्गर किंगने म्हणालंय की, ‘आम्ही कधीही कल्पना केली नव्हती की, आम्ही तुम्हाला केएफसी, डोमिनोज पिझ्झा, सबवे, फाइव्ह गाइज, ग्रेग्स, पापा जॉन, टाको बेल आणि इतर स्वतंत्र खाद्य व्यवसायिकांकडून ऑर्डर घेण्यास सांगू. थोडक्यात कोणत्याही फास्ट फूड चेनमधून (मग ती फास्ट असो वा नसो).’ पोस्टमध्ये पुढे म्हटलंय, ‘आम्हाला असं कधीही वाटलं नाही की, आम्ही असं आमच्या ग्राहकांना असं करण्यास सांगू, पण हजारो कर्मचारी कामावर असलेल्या रेस्टॉरंट्सला याक्षणी खरोखरच आपल्या समर्थनाची आवश्यकता आहे. म्हणूनच, जर तुम्हाला मदत करायची असेल तर, होम डिलिव्हरीद्वारे स्वतःसाठी चवदार जेवण ऑर्डर करा. टेक अवे किंवा ड्राईव्ह थ्रूचा देखील मार्ग निवडा.’ ट्विटरवर नेटिझन्सकडून अफाट प्रेम आणि आदर मिळवून बर्गर किंगचं हे ट्विट काही वेळातच व्हायरल झालं आहे. मॅकडोनल्ड्सच्या चाहत्याला तुमचा आदर वाटतो, काय अचूक अप्रतिम मूव्ह बर्गर किंग..., तुमचा खूप आदर वाटतो!, लोकांच्या अशा बर्याचच हृदयस्पर्शी प्रतिक्रियांनी पोस्टचा कमेंट बॉक्स भरला आहे. मार्केटवॉल डॉट कॉमच्या वृत्तानुसार, काही महिन्यांपूर्वी, बर्गर किंगने मानसिक आरोग्याच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी अमेरिकेतील निवडक शहरांमध्ये (न्यूयॉर्क शहर, लॉस एंजेलिस, सिएटल, ऑस्टन, टेक्सास आणि मीयामी) एका महिन्यासाठी 'रिअल मिल्स' हे अभियान राबवलं होतं.

  (वाचा - PHOTOS: एक-दोन नव्हे, तब्बल 58 तास kiss करुन या कपलने केला अनोखा रेकॉर्ड)

  त्यावेळी प्रतिस्पर्धी मॅक्डोनल्ड्सच्या 'हॅपी मील' या जाहिरातीच्या पंचलाइनला टक्कर देण्यासाठी बर्गर किंगने विविध भावनांशी संबंधित द ब्लू मील (The Blue Meal) (जेव्हा आपण दुःखी असाल तेव्हा); यास मील (Yaaas Meal)(जेव्हा आपण अत्यंत उत्साही असाल), पिस्ड मील (Pissed Meal) (जेव्हा आपण भुकेला असाल तेव्हा), सॉल्टी मील (Salty Meal) (जेव्हा आपण लढाऊ असाल), आणि डीजीएएफ मील (DGAF Meal) (जेव्हा आपल्याला कसला ही फरक पडत नसेल) हे सर्व मील बॉक्स मानसिक आरोग्य महिना म्हणून चिन्हांकित करण्यासाठी बर्गर किंगद्वारे आणलेल्या योजनेचा भाग होते.
  Published by:Karishma Bhurke
  First published: