मराठी बातम्या /बातम्या /विदेश /संकटातही मगरी कशा जिवंत राहू शकतात? संशोधनातून उलगडलं नवं रहस्य

संकटातही मगरी कशा जिवंत राहू शकतात? संशोधनातून उलगडलं नवं रहस्य

ब्रिस्टॉल विद्यापीठाने (Bristol University) केलेल्या या संशोधनानुसार, मगरींच्या आकारात संथपणे उत्क्रांती होते.

ब्रिस्टॉल विद्यापीठाने (Bristol University) केलेल्या या संशोधनानुसार, मगरींच्या आकारात संथपणे उत्क्रांती होते.

ब्रिस्टॉल विद्यापीठाने (Bristol University) केलेल्या या संशोधनानुसार, मगरींच्या आकारात संथपणे उत्क्रांती होते.

    नवी दिल्ली, 9 जानेवारी : 66 दशलक्ष वर्षांपूर्वी लघुग्रहांवरील (Asteroids) डायनोसॉर (Dinosaurs) नष्ट झाले, परंतु अशाही स्थितीत मगरी (Crocodiles) कशा जिवंत राहू शकल्या याबाबत एका संशोधनातून (Research) नुकताच प्रकाश टाकण्यात आला आहे. याबाबतचे संशोधन नेचर कम्युनिकेशन बायोलॉजी (Nature Communication Biology) या प्रसिध्द नियतकालिकात प्रसिद्ध झालं आहे.

    त्यात लघुग्रहावर संकटे आल्यानंतर पर्यावरणात कोणतेही बदल झाले तरी त्याला सक्षमपणे तोंड देत लघुग्रहावरील जीवन वाचवण्याची क्षमता मगरींमध्ये कशाप्रकारे असते, हे या संशोधनात मांडण्यात आले आहे. याबाबत या संशोधनाचे प्रमुख डॉ.मॅक्स स्टाकडेल म्हणाले, की याचे सर्व श्रेय मगरींच्या वैशिष्ठपूर्ण शरीररचनेला (Body Shapes) जाते. यातच लघुग्रहांना तडाखा बसल्यानंतर डायनोसार्सची संख्या कमी होत गेली, परंतु 200 दशलक्ष वर्षांचे सरपटणारे प्राणी मात्र जिवंत कसे राहू शकले, याचे स्पष्टीकरण असू शकते. सध्या जगभरात मगरींच्या 25 प्रजाती अस्तित्वात आहेत. ज्युरासिक काळातील प्रजाती आणि सध्या अस्तित्वात असलेल्या प्रजातींमध्ये साम्य असल्याचे दिसून येते. पक्षी आणि सरडे तसेच अन्य प्राण्यांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे.

    आई शपथ! साडी नेसून मारला जिमनॅस्टिकचा फ्लिप, VIDEO पाहून बसेल आश्चर्याचा धक्का

    ब्रिस्टॉल विद्यापीठाने (Bristol University) केलेल्या या संशोधनानुसार, मगरींच्या आकारात संथपणे उत्क्रांती होते. त्यानुसार त्यांच्या आकारमानात काही सुक्ष्म बदल झाल्याचे दिसून आले असून सध्याच्या जागतिक पातळीवरील गंभीर आपत्तींच्या काळातही त्यांना जगण्यासाठी हे बदल उपयुक्त ठरु शकतात. पर्यावरणीय बदलांनी उत्क्रांतीच्या स्टाप-स्टार्ट पध्दतीने नियंत्रण ठेवल्याचे दिसून येते. त्यामुळेच मगरींमध्ये आढळून येणारा एक समतोल हा उत्क्रांतीचा एक नमुना असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. मगरींमधील उत्क्रांतीचा दर अत्यंत संथ आहे. तथापि काही वेळा पर्यावरणीय कारणांमुळे ती अधिक वेगाने विकसित होते. मशीन लर्निंग अल्गोरिदमचा वापर करुन संशोधकांनी सरपटणाऱ्या प्राण्यांच्या उत्क्रांतीचा दर निश्चित केला आहे. उत्क्रांतीचा दर शोधून काढण्यासाठी संशोधकांनी या प्राण्यांच्या शरीराच्या आकारमानाचा अभ्यास केला. त्याच बरोबर या प्राण्यांची संख्या, त्यांचा आहार आणि वाढीचे प्रमाण आदींबाबतही संशोधन केले.

    अहवालानुसार, या ताज्या अभ्यासानुसार 20 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या आणखी एका संशोधनास पाठबळ मिळते, ज्यात असे सूचित करण्यात आले होते की आकारमानामुळे मगरींमध्ये धैर्य अधिक असते. लघुग्रहावर संकटे आल्यानंतरही असे बरेच घटक आहेत की ज्यामुळे अशा संकटातही मगर आपला बचाव करु शकते. उबदारपणा मिळवण्यासाठी मगरी सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करतात, त्यामुळे त्यांच्या बचावासाठी हे देखील एक प्रमुख कारण नमूद करता येईल. म्हणूनच त्या कोणत्याही प्रकारच्या मांसहारावर अवलंबून राहत नाहीत. हा प्राणी अत्यंत मजबूत असल्याने त्यांना कोणत्याही जखमा होत नाहीत. मगरी या अंधारातहीजगू शकतात तसेच त्या जमीन आणि पाण्यातूनही मार्ग काढू शकतात.

    काळा गॉगल, हातात काठी, 100 वर्षांच्या मुंबईच्या आजी Facebook वर हिट

    मगरी सुमारे एक तास पाण्याखाली राहून श्वास रोखू शकतात, जिवंत राहण्यासाठी त्यांच्याकडील अनेक क्षमतांपैकी ही एक महत्वाची क्षमता समजली जाते. काही प्रजातींच्या मगरी या मृत्यूमुखी का पडल्या आणि अन्य प्रजातीतील मगर जिवंत कशा राहिल्या याचा शोध आता संशोधकांचे पथक घेणार आहे.

    First published: