बिजिंग, 03 डिसेंबर: शाळांमध्ये मोबाइल फोन नेण्यास बऱ्याच ठिकाणी परवानगी नसते. भारतातही अनेक शाळात हाच नियम लागू होतो. मात्र विद्यार्थ्यांना समज दिली जाते किंवा फार फार तर फोन जप्त केला जातो. पण चीनमधील एका शाळेत मुलाकडे फोन सापडल्यास शिक्षा खूप कठोर आहे. ही शाळा विद्यार्थ्यांना मोबाइल फोन आणण्यापासून रोखण्यासाठी अत्यंत विध्वंसक मार्ग निवडत असल्याचं समोर आलं आहे.
डेलीमेलच्या अहवालानुसार, ही चिनी शाळा विद्यार्थी कॅम्पसमध्ये मोबाईल किंवा इतर डिव्हाईस आणत असल्याचे आढळून आल्यास त्यांना ते फोन जमिनीवर आपटून फोडण्यास भाग पाडत आहे. काही ऑनलाईन शोजमध्ये मोठ्या प्रमाणात शेअर केलेल्या या फूटेजमध्ये तीन विद्यार्थीनींना त्यांच्या शिक्षकांकडून वारंवार ग्राउंडवर हॅन्डसेटला आपटण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा व्हिडिओ दक्षिण-पश्चिम चीनच्या युन्नान प्रांतातील मेंगझी शहरातील एका अज्ञात शाळेचा असल्याचा म्हटले जात आहे. या शाळेवर मुलांना हँडसेट फोडण्यास सांगण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. हा व्हिडीओ प्रसिद्ध झाल्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी पत्रकारांना सांगितले की ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांनी असं म्हटलं आहे की, शाळेने विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गात फोन आणण्यास बंदी घातली होती. एका अज्ञात युजरने चीनी सोशल मीडियावर हे फुटेज अपलोड केल्यानंतर ही घटना उघडकीस आली असल्याचे या अहवालात पुढे म्हटले आहे.
(हे वाचा-बदलला बँक खात्यातून पैसे काढण्याचा नियम, कोट्यवधी ग्राहंकावर होणार थेट परिणाम)
या व्हिडीओनुसार, कॅम्पसमध्ये फोन आणताना पकडले गेल्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षा करण्यात आली. फुटेजमध्ये तीन मुली रांगेत त्यांचे फोन घेऊन उभ्या असल्याचे दिसत आहे तर एक वयस्क महिला जी त्यांची शिक्षिका असू शकते, ही महिला त्यांना जमिनीवर त्यांचे फोन आपटून फोडण्याची ऑर्डर देताना दिसते. तर विद्यार्थिनी नाखूषीने सावकाश त्यांचे हँडसेट जमिनीवर टाकताना दिसत आहेत.
अहवालानुसार एका अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितले की त्यांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. काही नेटिझन्सन शाळेच्या दृष्टिकोनाशी सहमत झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. तर काहींनी विद्यार्थ्यांच्या हक्काबाबत विचारणा केली आहे.
(हे वाचा-5वी पास असूनही उभारला कोटींचा व्यवसाय! असा होता 'MDH वाले दादाजीं'चा प्रवास)
बातमीत पुढे असं नमूद केलं आहे की एका व्यक्तीने कमेंटमध्ये म्हटलं आहे की ही एक चांगली कल्पना आहे आणि जर माझ्या मुलाने नियम मोडला आणि त्याने फोन शाळेत नेला तर शिक्षकांना तो फोन फोडण्यासाठी मी पाठिंबा देईन. दुसर्या व्यक्तीने कमेंट दिली की जर विद्यार्थ्यांनी नियम मोडला तर ते त्यांचे फोन काढून पालकांना देऊ शकतात. फोन तोडण्याच्या शिक्षेमुळे हेतूपूर्वक इतर लोकांच्या वस्तूंचे नुकसान होत आहे आणि हे अगदीच अयोग्य आहे.