Home /News /videsh /

चोरट्यांनी केलं भलतंच काम; पैसा-दागिने नाही तर 17 लाखांच्या 'या' पदार्थावर मारला डल्ला

चोरट्यांनी केलं भलतंच काम; पैसा-दागिने नाही तर 17 लाखांच्या 'या' पदार्थावर मारला डल्ला

नुकतीच शेतकऱ्यांच्या डेअरी फार्ममधून चीज चोरल्याची (Thieves steal cheese from dairy farm) घटना घडली आहे. थोडंथोडकं नाही तर तब्बल 17 लाख रुपयांचं चीज चोरीला गेलं आहे.

    नवी दिल्ली, 08 एप्रिल : तुम्ही पैसे, वाहनं चोरीला गेल्याचं, बँकांमध्ये किंवा घरांमध्ये दरोडा पडल्याचं पाहिलं असेल. पण तुम्ही कधी चोरांनी दूध, दही, चीजसारखे अन्नपदार्थ चोरल्याचं ऐकलंय का?. तसे, लोक अन्नपदार्थ देखील चोरतात. परंतु, सहसा ते भुकेले असल्यामुळं अशा चोऱ्या घडतात. पण नुकतीच शेतकऱ्यांच्या डेअरी फार्ममधून चीज चोरल्याची (Thieves steal cheese from dairy farm) घटना घडली आहे. थोडंथोडकं नाही तर तब्बल 17 लाख रुपयांचं चीज चोरीला गेलं आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात नेदरलँडच्या नूर्ड ब्राबंट (Noord Brabant, Netherlands) येथील टोरेनपोल्डरकास डेअरी फार्ममध्ये (Torenpolderkaas dairy farm) अशी चोरी झाली, ज्याचा कोणी विचारही केला नसेल. चोरट्यांनी येथून 17 लाख रुपयांचं 1500 किलो चीज चोरलं आहे. या चोरीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हे वाचा - डॉक्टर कसले, हे तर हैवान! मरण्यापूर्वीच काढायचे कैद्यांचे हृदय आणि फुफ्फुसं चोरट्यांनी डेअरी फार्ममधून चीज चोरले डच असोसिएशन ऑफ फार्म डेअरीचे अध्यक्ष थिओ डेकर म्हणाले की, नेदरलँडमधील शेतकरी नेहमीच त्यांच्या उत्पादनाची चोरी होईल, या भीतीमध्ये जगत असतात. इथं अशी चोरी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. ते म्हणाले की, येथील कोणत्याही डेअरी फार्ममध्ये चोर शिरू शकतात. यावेळी त्यांनी फार्ममधून एक बस भरून चीज पळवलं आहे. हे वाचा - रशियालाही मोजावी लागतेय युद्धाची किंमत, महागाई 45 टक्क्यांनी वाढली चीजची किंमत 17 होती लाख रुपये हे चीज चोरल्यामुळं शेतकऱ्यांचं 17 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. चेअरमन म्हणाले की, काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी डेअरीची टेहळणी केली होती. त्यांनी काय आणि कुठून चोरी करायची हे पाहिलं होतं. त्यांच्या मते, कोणतेही दुग्धजन्य पदार्थ, विशेषत: चीज चोरणं फायदेशीर आहे. कारण, ते सहजपणे चोरून नेलं जाऊ शकतं आणि ते खूप जास्त किमतीत विकलंही जाऊ शकतं. मात्र, एक चांगली गोष्ट अशी आहे की, जेव्हापासून देशात चीज चोरीचे प्रमाण वाढले आहे, तेव्हापासून त्याच्या आत ट्रॅकर ठेवले जातात. ते चीज तोडल्यानंतरच बाहेर काढले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत नेदरलँडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात चीज विकता येणार नसल्याचा दावा अध्यक्षांनी केला आहे.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Crime, Crime news

    पुढील बातम्या