Home /News /videsh /

ज्या वुहानमधून जगभर कोरोना पसरला तिथे आता एकही रुग्ण नाही!

ज्या वुहानमधून जगभर कोरोना पसरला तिथे आता एकही रुग्ण नाही!

वुहानमध्ये कोव्हिड-19चा आता एकही रुग्ण शिल्लक नाही. 76 दिवस म्हणजेच किमान अडीच महिन्याच्या लॉकडाऊननंतर अखेर 8 एप्रिलला वुहानमध्ये लॉकडाऊन उघण्यात आलं.

    नवी दिल्ली, 27 एप्रिल : काही महिन्यांपूर्वी कोव्हिड-19चा पहिला रुग्ण चीनच्या वुहानमधील रूग्णालयात दाखल झाला आणि तिथून कोरोना साथीचा हा आजार अवघ्या जगभरात पसरला. वृत्तसंस्था पीटीआयने, चीनची अधिकृत न्यूज एजन्सी शिन्हुआच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, वुहानमध्ये कोव्हिड-19चा आता एकही रुग्ण शिल्लक नाही. 76 दिवस म्हणजेच किमान अडीच महिन्याच्या लॉकडाऊननंतर अखेर 8 एप्रिलला वुहानमध्ये लॉकडाऊन उघण्यात आलं. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या प्रवक्त्या मी फेंग यांनी सांगितलं की, वुहानच्या आरोग्य कर्मचार्‍यांच्या परिश्रम आणि देशभरातून ज्यांना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी पाठवण्यात आलं होतं त्यांच्या मदतीमुळे हे यश शक्य झालं आहे. शिन्हुआच्या म्हणण्यानुसार, आयोग्य प्रवक्त्यानं सांगितलं की, वुहानमधील शेवटच्या रुग्णाला शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे, त्यानंतर वुहानमधील कोरोना रूग्णांची संख्या शून्यावर आहे. हुबेईच्या आरोग्य आयोगानं म्हटलं की, शनिवारी वुहानमध्ये कोव्हिड-19पासून संसर्ग किंवा मृत्यूची एकही घटना नोंदली गेली नव्हती. वुहानच्या रुग्णालयातून 11 रूग्ण बरे झाल्यावर त्यांना घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत हुबेईमध्ये संक्रमणाची 68,128 प्रकरणं नोंदली गेली आहेत, त्यापैकी 50,333 वुहानमधील आहेत. लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्याला आता 6 फुटांवरून पकडणार पोलीस, VIDEO VIRAL वुहानपासून कोरोना जगभर पसरला जगात कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण जानेवारीत चीनमध्ये आढळला आणि त्याचा सर्वात मोठा परिणाम तेथील हुबेई आणि वुहानमध्ये दिसून आला. डिसेंबरच्या अखेरीस वुहानमध्ये कोरोना विषाणूचा धोका असल्याचं चीननं अधिकृतपणे सांगितलं. परंतु 23 जानेवारीपासून साडेपाच लाख लोकसंख्येसह हुबेईमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. युनायटेड स्टेट्स आणि इतर बऱ्याच देशांनी चीनवर टीका केली की ते खूप उशीरा लॉकडाऊन लागू झालं, यामुळे हा विषाणू जगभर पसरला. वुहानमधील सीफूड मार्केटमधून किंवा वुहानमधील प्रयोगशाळेतून व्हायरसचा पसरला असा आरोपही करण्यात आला. पण कोरोना विषाणूचा जन्म हा एक वैज्ञानिक प्रश्न असून त्याचं उत्तर शोधण्यासाठी काही शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय मंडळी करत असल्याचं सांगण्यात येत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येवर शंका, ICMR आणि NCDC यांच्या आकड्यांमध्ये मोठा फरक वुहानच्या आकड्यांवर संशय चीनवर असेही आरोप लावले गेले होते की, ते खरी आकडेवारी जाहीर करत नाहीत. चीननेही वुहानमध्ये मृतांच्या संख्येत 50 टक्क्यांनी वाढ केली. चीनच्या स्थानिक प्रशासनाने सांगितलं की 16 एप्रिलपर्यंत वुहानमध्ये मृतांच्या संख्येत आणखी 1,290 लोकांची वाढ झाली आणि आता ती संख्या 3,869 वर पोचली आहे. त्यावेळी चीनमधील मृतांची संख्या 4,632 वर पोचली होती. चिनी परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे की, ही आकडेवारी दुरुस्त करावी लागली कारण काही अहवाल उशिरा मिळाले होते आणि सुरुवातीच्या काळात काही त्रुटीही आल्या. चीनी अधिकाऱ्यांनी असंही म्हटलं आहे की, वुहानमधील चिनी नववर्षाच्या निमित्तानं 50 लाखाहूनही अधिक लोक फिरायला गेले होते, त्यामुळे विषाणू बाहेर पसरला होता. दाट लोकसंख्या, प्रचंड गरीबी तरी विकसित देशापेक्षा दक्षिण आशियात कोरोनाचा कहर कमी संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या