नवी दिल्ली, 25 डिसेंबर : नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (James webb space telescope) आज क्रिसमसच्या दिवशी एरियन रॉकेटच्या माध्यमातून फ्रेंच गुयाना स्थित लॉन्चिंग बेसमधून लॉन्च (telescope Launched today) करण्यात येणार आहे. हा टेलिस्कोप नासा, यूरोपियन स्पेस एजन्सी आणि कॅनेडियन स्पेस एजन्सीने तयार केला आहे. यासाठी तब्बल 75 हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे. हा जगातील शक्तीशाली टेलिस्कोप आहे. हा अंतराळातून जमिनीवर उडणाऱ्या पक्षालाही सहजपणे डिटेक्ट करू शकतो, यावर याच्या क्षमतेचा अंदाज लावता येऊ शकतो.
1990 मध्ये पाठलेल्या हबल टेलिस्कोपच्या तुलनेत हा 100 पटीने जास्त शक्तीशाली आहे. याच्या माध्यमातून विश्वाच्या सुरुवातीच्या कालात तयार झालेल्या गॅलेक्सी, उल्कापिंड आणि ग्रहांची माहिती घेता येऊ शकते. हा टेलिस्कोप विश्वाची रहस्य उघड करण्याबरोबरच एलियनचं अस्तित्वाचाही शोध घेईल. यामुळे अनेक गुंतागुतीच्या बाबी सोप्या होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (The world's most powerful telescope Launched today at a cost of Rs 75000 crore the James Webb Space Telescope will also detect the presence of aliens)
टेलिस्कोपच्या ऑप्टिक्सवर सोन्याची पातळ लेअर लावण्यात आली आहे. परिणामी इंफ्रारेड लाइट डिफलेक्ट होईल. यामुळे टेलिस्कोप थंड राहिलं. कॅमेऱ्याला सुर्याच्या उष्णतेपासून वाचवण्यासाठी यात टेनिस कोर्टाच्या आकाराची 5 लेअर असलेली सनशील्ड लावण्यात आली आहे. टेलिस्कोपचा व्यास 21 मीटर आहे.
हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा इंटरनॅशनल स्पेस सायन्स प्रोजेक्ट आहे.
याचं नाव नासाचे दुसरे प्रमुख 'जेम्स वेब'च्या नावावर ठेवण्यात आलं आहे. नासाने या टेलिस्कोपमध्ये वेळेसह अनेक अत्याधुनिक टेक्नोलॉजी जोडली आहे. यामुळे विश्वाचे अनेक रहस्य समोर येऊ शकतात. हा टेलिस्कोप हबल टेलिस्कोपची जागा घेईल. नासाने एप्रिल 1990 मध्ये आपला पहिला अंतराळ टेलिस्कोप हबल स्थापन केला होता.
या टेलिस्कोपच्या मदतीने विश्वाचं वय 13 चे 14 अरब वर्षांदरम्यान असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र 6 महिन्यांपर्वी हबल स्पेस टेलिस्कोपने अचानक काम करणं बंद केलं. आता याजागी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप काम करणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nasa