वॉशिंग्टन, 16 ऑक्टोबर : अमेरिकेच्या (US) लॉस एंजेलिस (Los Angeles) मधून एक हैराण करणारं वृत्त समोर आलं आहे. (Viral News) . येथे एक महिला तब्बल 8 आठवड्यांपर्यंत एका मृतदेहाच्या अवघ्या 3 फूट अंतरावर झोपली होती आणि तिला याबद्दल कळालं नाही. जेव्हा महिलेला याबद्दल कळालं तर तिला जबर धक्का बसला.
या विचित्र घटनेवर विश्वास ठेवणं अवघड
द सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, महिलेचं नाव रीगन बेली (Reagan Baylee) आहे. तिने टिकटॉ व्हिडीओच्या माध्यमातून या विचित्र घटनेची माहिती दिली. तिने टिकटॉक व्हिडीओच्या माध्यमातून या विचित्र घटनेची माहिती दिली. जो कोणी या घटनेबद्दल ऐकत आहे, त्यालादेखील यावर विश्वास ठेवणं कठीण जात आहे.
भयंकर दुर्गंधीमुळे महिला झाली होती त्रस्त...
रीगनने सांगितलं की, मे 2020 मध्ये तिच्यासोबत असं काही घडलं होतं. अनेक दिवसांपासून तिच्या खोलीत दुर्गंधी येत होती. मात्र यामागील कारण तिला कळत नव्हतं. सुरुवातीला तिला वाटलं की, हा वास सडलेल्या माशांचा आहे. मात्र तिने अख्खं घर शोधलं तरी तिला काहीच सापडलं नाही. मग काही दिवसांनंतर तिच्या घरात किडे येऊ लागले. रीगनला कळत नव्हतं की हे असं का घडत आहे.
महिला पुढे म्हणाली की, दुर्गंधीची तक्रार महिलेने अपार्टमेंटच्या मॅनेजरलाही केली. मात्र त्यालाही यामागील कारण कळत नव्हतं. पुन्हा तिने तक्रार केली तर मॅनेजर संतप्त झाली आणि तुम्ही शेजारच्यांनाही त्रास देत असल्याचं सांगितलं.
हे ही वाचा-अरे देवा! तरुणाने केला गर्लफ्रेंडचा भांडाफोड; त्या सवयी सोशल मीडियावर शेअर
शेवटी असा झाला खुलासा...
यानंतर महिलेने पोलिसांना बोलावलं. त्यानंतर कळालं की, तिच्या बेडरूमला लागून असलेल्या खोलीत एका व्यक्तीचा 8 आठवड्यांपूर्वी मृत्यू झाला होता. महिलेने सांगितलं की, त्या व्यक्तीचा बेड आणि मृतदेह जेथे पडला होता, तेथून महिलेच्या बेडचं अंतर अवघे 3 फूटांचं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: America, Dead body, Shocking news