Home /News /videsh /

महिलेला झालं 'पंचाळं', रुग्णालयातून एक-एक करीत घरी आणण्यासाठी लागले 2 महिने

महिलेला झालं 'पंचाळं', रुग्णालयातून एक-एक करीत घरी आणण्यासाठी लागले 2 महिने

ब्रेंडा रेमुंडो ही अशा दुर्मीळ मातांपैकी एक बनली आहे, जिनं जुळ्या किंवा तिळ्या बाळांना जन्म दिला नसून चक्क पाच मुलांना जन्म दिलाय. आता सर्व मुलं निरोगी आहेत आणि मजेत खेळत आहेत. पण जेव्हा त्यांचा जन्म झाला, तेव्हा त्यांना एक-एक करून हॉस्पिटलमधून घरी आणण्यासाठी 2 महिने लागले.

पुढे वाचा ...
    टेक्सास, 12 मे : 'मुलं ही देवाघरची फुलं' असतात, असं म्हटलं जातं. बहुतेक जोडप्यांना मुलं (baby birth) हवी असतात. प्रत्येकाला एक किंवा दोन मुलं असावीत असं वाटतं. घराघरात लहान मुलांच्या खेळण्यानं वातावरण प्रसन्न होतं. अशीच या जोडप्याचीही इच्छा होती. पण त्यांची ही इच्छा अशा पद्धतीने पूर्ण होईल, असं त्यांना चुकूनही वाटलं नव्हतं. आता त्यांच्या घरात नेहमी पाच मुलांचा किलबिलाट सुरू असतो आणि या दाम्पत्यासह घरात राहणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांचीही पुरती दमछाक झाली आहे. टेक्सासची ब्रेंडा रेमुंडो केवळ 29 वर्षांची होती, जेव्हा ती 5 मुलांची आई बनली होती. परंतु, तिला गर्भधारणा फक्त एकदाच झाली. ब्रेंडा ही अशा दुर्मीळ मातांपैकी एक आहे ज्यांना एकाच वेळी 5-5 मुलं झाली. अशा मुलांना क्विंटुप्लेट्स (Quintuplets) म्हणतात. आईने एकाच वेळी दिला 5 मुलांना जन्म ब्रेंडा रेमुंडोला आधीच आई व्हायचं होतं. पण काही गुंतागुंती होत्या. त्यामुळे तिला वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. त्यानंतर त्यांना ती आनंदाची बातमी मिळाली, ज्याची ते वाट पाहत होते. ती आई होणार होती. पण या आनंदासोबतच अशी बातमी आली, ज्याने त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ब्रेंडा एकाच वेळी तिच्या पोटात 5 मुलांना वाढवत होती. प्रसूतीच्या वेळी, ही बातमी रुग्णालयातील कर्मचार्‍यांसाठी देखील आश्चर्यचकित करणारी होती. कारण त्यांनी अशी प्रकरणं क्वचितच पाहिली होती. पार्कलँड मेमोरियल हॉस्पिटलच्या इतिहासात आतापर्यंत केवळ पाच क्विंटपलेटची (Quintuplets) नोंद झाली आहे, जिथे ब्रेंडाची प्रसूती झाली. सौ. सोशल मीडिया : ही पाट गोंडस बाळं आता एक वर्षाची झाली आहेत. आता सर्व मुलं निरोगी आहेत आणि मजेत खेळत आहेत. मात्र, एका वेळी पाच बाळं सांभाळणं अवघड काम आहे. तसंच, ते शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्याही कठीण आहे.
    सौ. सोशल मीडिया : ही पाच गोंडस बाळं आता एक वर्षाची झाली आहेत. आता सर्व मुलं निरोगी आहेत आणि मजेत खेळत आहेत. मात्र, एका वेळी पाच बाळं सांभाळणं अवघड काम आहे. तसंच, ते शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्याही कठीण आहे.
    एकाच वेळी 5 नवजात बालकांना सांभाळणं सोपं नाही एकावेळी एकापेक्षा जास्त मुलं जन्माला आल्यानं अनेकदा ही मुलं थोडी अशक्त होतात आणि इथे तर 5 मुलं होती. त्यामुळे, जन्मानंतर, सर्व मुलांना काही काळ इनक्यूबेटरमध्ये घालवावे लागले. मूळतः मेक्सिकोची असलेल्या ब्रेंडा आणि पती अलेजांद्रो इबारा त्यांच्या बाळांना पाहण्यासाठी आणि त्यांना दूध पाजण्यासाठी दररोज रुग्णालयात जावं लागत होतं. त्यानंतर त्यांना एक-एक करून घरी आणण्यात आलं. गेल्या वर्षी 17 मे रोजी सर्व मुलांचा जन्म झाला होता आणि 30 जुलैपर्यंत सर्वांना घरी आणलं होतं. आता एकाच वेळी एकाच वयाच्या या पाच बाळांना सांभाळताना आई-वडिलांची शारीरिक आणि आर्थिक स्थिती काय झाली असेल, याची कल्पना करा. सुदैवाने, मुलांच्या आजी, ब्रेंडाची आई, मारिया अकोस्टा, त्यांना मदत करण्यासाठी उपस्थित होत्या. आता 2 मुलं आजीसोबत झोपली आणि इतर 3 ब्रेंडा आणि तिच्या पतीसोबत झोपतात. अशा प्रकारे त्यांना रोजचा दिवस पार पाडायचा असतो. ब्रेंडाने एक Tiktok खातं तयार केलं आहे, जेथे ती Quintuplets सोबत म्हणजे तिच्या पाचही बाळांसोबत आहे. पेजवर तिचे 2.5 लाख फॉलोअर्स असून ती 5 मुलांसोबतचे तिचे अनुभव शेअर करत असते. याला 3 मिलियन लाईक्स मिळालेल्या आहेत.

    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: America, Pregnancy

    पुढील बातम्या