मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

किम जोंग उनच्या बहिणीच्या धमकीने दक्षिण कोरियाही हादरलं; ऐकावी लागली ही गोष्ट

किम जोंग उनच्या बहिणीच्या धमकीने दक्षिण कोरियाही हादरलं; ऐकावी लागली ही गोष्ट

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची अतिशय शक्तिशाली बहीण किम यो जोंग यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आहे.

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची अतिशय शक्तिशाली बहीण किम यो जोंग यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आहे.

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची अतिशय शक्तिशाली बहीण किम यो जोंग यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 7 जून : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची अत्यंत शक्तिशाली बहीण किम यो जोंग पुन्हा चर्चेत आली आहे. जनतेमध्ये किम यो जोंग यांची दहशत इतकी आहे की, त्यांच्यामुळे दक्षिण कोरियाला उ. कोरियाच्या दीर्घकाळ चाललेल्या मागण्यांपैकी एक स्वीकारण्यास भाग पाडले आहे. उत्तर कोरियामधील बंडखोर दक्षिण कोरियातून सीमेवर फुगे उडवतात, या फुग्यांवर किम जोंग-उन यांच्या हुकूमशाहीविरूद्ध संदेश लिहितात, अशी माहिती समोर आली आहे.

बंडखोर म्हणजे 'विश्वासघाती कुत्रे', किम यांचे मत

किम यो-जोंग यांनी उत्तर कोरियाच्या बंडखोरांना, त्यांच्याच देशाचा विश्वासघात करणारे कुत्रे म्हणून संबोधले आहे. हुकूमशहाच्या बहिणीने दक्षिण कोरियाला धमकी दिली की, ही विरोधी निदर्शने जर थांबवली नाहीत, तर दोन्ही देशांमधील सैन्य करार रद्द करण्यात येतील. किम यो जोंग यांच्या मागणी समोर झुकत दक्षिण कोरियानेही अशी घोषणा केली आहे की अशा प्रकारचे निषेध आंदोलन रोखण्यासाठी नवीन कायदा करण्यात येईल.

दक्षिण कोरियाने यापूर्वी ही फेटाळली होती कारवाईची मागणी

या कायद्यानंतर, दक्षिण कोरियाचे उत्तर कोरियाशी संबंध सामान्य राहतील, अशी द. कोरियाला आशा आहे. यापूर्वी अशा फुगे उडवणाऱ्यांना रोखण्यासाठी दक्षिण कोरियाने अनेकदा पोलिसांना पाठवले आहे. या बंडखोरांवर बंदीच्या कारवाईची उत्तर कोरियाची मागणी मात्र अनेकदा द. कोरियाने फेटाळली होती. दक्षिण कोरियामधून असे फुगे उत्तर कोरियात सोडण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. हा आपल्या सरकारवरील हल्ला असल्याचे उ. कोरिया सरकारचे म्हणणे आहे.

दक्षिण कोरियासोबत सैन्य करार तोडण्याची धमकी

उ. कोरियाच्या हुकुमशाहांची अणूबॉम्ब तयार करण्याची महत्त्वाकांक्षा आणि मानवाधिकारांचे उल्लंघन यावर टीका करणारे फुगे काही दिवसांपूर्वी बंडखोरांनी उडविले होते. यानंतर किम जोंग उन यांच्या बहिणीने सैन्य करार तोडण्याची धमकी दिली. किम यांनी म्हटले की, जर या बंडखोरांवर द. कोरियाने कारवाई केली नाही तर दोन्ही देशांतील चांगल्या संबंधांचे प्रतीक मानण्यात येणारी कंपनी आणि संपर्क कार्य़ालय बंद करण्यात येईल.

हुकूमशाह किम जोंग यांच्याहून जास्त क्रूर आहे बहीण

मिरर या इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, किम यो जोंग या अत्यंत क्रूर आहेत. असे मानले जाते की, हुकुमशाह जोंग यांच्यापर्यंत कोणते मुद्दे पोहचवायला हवेत, याचा निर्णय त्या स्वत: करतात. पक्षातील लोकांनी यो जोंग यांच्याशी आदराने आणि भीतीने वागावे, असेही त्या नेहमी सांगतात. उत्तर कोरियामधील माध्यमांतही त्यांची नेहमीच चर्चा असते, त्या वॉईस डायरेक्टर झाल्या नसल्या, तरी त्यांची योग्यता तीच मानली जाते. संघटना आणि मार्गदर्शन विभागातील किम यो जोंग यांची वाढती प्रतिष्ठा लक्षात घेता त्यांना उ. कोरियातील नंबर दोन स्थानावर मानले जाते.

दक्षिण कोरियाशी बोलणी करतात किम यो जोंग

उत्तर कोरियाच्या लाइव्ह लष्कर अभ्यासाचा द. कोरियाने विरोध केला होता, त्यावर "घाबरलेले कुत्रे भुंकत आहेत" अशी प्रतिक्रिया किम यो जोंग यांनी दिली होती. यापूर्वी मार्चच्या सुरुवातीला अमेरिकेचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्र पाठविल्याबद्दल किम यो जोंग यांनी त्यांचे जाहीर कौतुक केले होते. उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील संबंध सुधारतील अशी आशा किम यो जोंग यांनी व्यक्त केली होती. कोरियन जाणकार लियोनिड पेट्रोव्ह म्हणतात, 'किम यो जोंग यांचा त्यांचा त्यांच्या भावाशी थेट संपर्क आहे. इतकेच नाही तर या बहिणीचा कोरियन राज्यकर्त्यांवरही खोल प्रभाव आहे. किम यो जोंग ही भावाप्रती सर्वाधिक निष्ठावान आहे, आणि त्यामुळे त्याच विदेशी आणि दक्षिण कोरियाशी बोलणी करतात. आपल्या भावाची सकारात्मक प्रतिमा जगासमोर आणण्याचा त्यांचां प्रयत्न असतो.

हे वाचा-करुन दाखवलं! भारताने तयार केली स्वस्त कोरोना किट, अवघ्या काही मिनिटांत रिझल्

First published: