Home /News /videsh /

WHO म्हणतं, कोरोना विरुद्ध कसं लढावं हे जगाने पाकिस्तानकडून शिकावं!

WHO म्हणतं, कोरोना विरुद्ध कसं लढावं हे जगाने पाकिस्तानकडून शिकावं!

कोरोनाविरुद्ध पाकिस्तान सरकारने (Pakistan Government) आखलेल्या योजनांचंही WHOने कौतुक केलं आहे.

    इस्लामाबाद 12 सप्टेंबर: कोरोनाविरुद्ध सर्व जग सध्या लढत आहे. प्रत्येक देशापुढे कोरोनाला कसं रोखावं हे आव्हान आहे. असं असतांनाच जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organisation) पाकिस्तानचं कौतुक केलं आहे. कोरोनाला कसं रोखावं हे जागने पाकिस्तानकडून शिकावं असं WHOचे प्रमुख ट्रेडोस एडनहोम यांनी म्हटलं आहे. कोरोनाविरुद्ध पाकिस्तान सरकारने (Pakistan Government)  आखलेल्या योजनांचंही त्यांनी कौतुक केलं आहे. पोलिओविरुद्ध लढण्यासाठी ज्या पायाभूत सुविधा पाकिस्तानने निर्माण केल्या होत्या त्याचा वापर करत पाकिस्तानने कोरोनाला रोखण्यात यश मिळविल्याचं सांगितलं जात आहे. पोलिओ निर्मुलनात ज्या आरोग्य कार्यकर्त्यांनी योगदान दिलं त्यांचा वापर करत कोरोनाला रोखण्यात यश मिळालं आहे. या पॅटर्नचा वापर नेमका कसा झाला हे जगाने शिकण्यासारखं आहे असंही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. पाकिस्तानसोबतच थायलंड, कंबोडिया, जपान, न्युझिलंड, कोरिया गणराज्य, रवांडा, सेनेगल, इटली, स्पेन आणि व्हिएतनाम या देशांनीही कोरोनाविरुद्धच्या लढ्यात चांगलं काम केलं असंही WHOने म्हटलं आहे. Good News: Oxfordच्या कोरोना लशींच्या चाचण्यांवरची बंदी उठवली, भारतालाही फायदा पाकिस्तानमध्ये आत्तापर्यंत 3 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले असून 6 हजार 370 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 6 हजारांच्या आसपास रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा दावाही करण्यात येत आहे. दरम्यान,  सर्व जगाचं लक्ष लागलेल्या AstraZeneca आणि Oxfordने विकसित केलेल्या लशींच्या चाचण्यांवरची बंदी उठविण्यात आली आहे. या लशीच्या मानवी चाचण्यांदरम्यान एका व्यक्तिची प्रकृती बिघडल्याने सरकारने तात्पुरती बंदी घातली होती. ब्रिटनच्या Medicines Health Regulatory Authority (MHRA)ने पुन्हा परवानगी दिल्याचं सांगितलं आहे. या निर्णयाचा संशोधनाला मोठा फायदा होणार असून आता भारतासह जगभरात सुरू असलेल्या चाचण्या पुन्हा सुरू होणार आहेत. पुन्हा भडकला कोरियाचा हुकूमशहा; मंत्रालयातील 5 अधिकाऱ्यांना घातल्या गोळ्या या औषधाच्या चाचण्या या पूर्णपणे सुरक्षीत असल्याचं MHRAने म्हटलं आहे. ब्रिटनमध्ये एका व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने या चाचण्या थांबिण्यात आल्या होत्या. त्यावर तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल दिला असून त्यात चाचण्या पुन्हा सुरू करण्यास हरकत नाही अशी शिफारस केली आहे. भारतात पुण्यासह काही शहरांमध्ये या चाचण्या सुरू असून सीरम इन्स्टिट्यूट या लशीचं उत्पादन करणार आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus, Pakistan

    पुढील बातम्या