मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

पाणी पेटलं! किर्गिस्तान-ताजिकिस्तान सीमेवर पाण्यासाठी हिंसाचार; 31 मृत्यूमुखी

पाणी पेटलं! किर्गिस्तान-ताजिकिस्तान सीमेवर पाण्यासाठी हिंसाचार; 31 मृत्यूमुखी

किर्गिस्तान-ताजिकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांपासून पाण्याच्या स्रोतांवरून वाद सुरू असून, दोन्ही देश त्यावर आपला हक्क सांगत आहेत.

किर्गिस्तान-ताजिकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांपासून पाण्याच्या स्रोतांवरून वाद सुरू असून, दोन्ही देश त्यावर आपला हक्क सांगत आहेत.

किर्गिस्तान-ताजिकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांपासून पाण्याच्या स्रोतांवरून वाद सुरू असून, दोन्ही देश त्यावर आपला हक्क सांगत आहेत.

किर्गिस्तान (Kyrgyzstan)-ताजिकिस्तानमध्ये (Tajikistan) पाण्यावरून (Water) संघर्ष (Clashes) पेटला असून, नुकत्याच दोन्ही देशांच्या वादग्रस्त सीमेवर झालेल्या चकमकींमध्ये कमीतकमी 31 लोक ठार झाले. तर शेकडो लोक जखमी झाले.

किर्गिस्तानच्या बाटकन प्रांताच्या परिसरात बुधवारी दोन्ही बाजूंच्या लोकांनी एकमेकांवर केलेल्या दगडफेकीतून या संघर्षाला सुरुवात झाली. गुरुवारी त्यात दोन्ही बाजूंच्या सैन्यानंही भाग घेतला आणि दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. नागरिकांनीही गोळीबार केला आणि या संघर्षानं अधिक हिंसक रूप धारण केलं. अनेक ठिकाणी आगी लावण्यात आल्या. बाटकन प्रांतात 20 पेक्षा जास्त घरं, शाळा, एक लष्करी ठाणं, आठ दुकानं आणि एक कसिनो आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचं किर्गिस्तान इमर्जन्सी मंत्रालयानं म्हटलं आहे. तर या संघर्षात आतापर्यंत 31 लोकांचा मृत्यू झाला असून, 150 लोक जखमी झाल्याची माहिती किर्गिस्तानच्या आरोग्यमंत्री अलिझा सोलटेन बिकोवा यांनी दिली आहे. या चकमकींनंतर तब्बल दहा हजार लोकांना इथून सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.

किर्गिस्तान-ताजिकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांपासून पाण्याच्या स्रोतांवरून वाद सुरू असून, दोन्ही देश त्यावर आपला हक्क सांगत आहेत. मध्य आशियातील अन्य देशांप्रमाणेच या दोन्ही देशांमध्ये गेल्या तीस वर्षांपासून सीमेवरून वाद सुरू आहे. सोव्हिएत संघाच्या विभाजनानंतर सीमाभागात नाकाबंदी करण्यात आल्यानं इथं तणाव वाढला आहे. ताजिकिस्तान आणि किर्गिस्तानमधील सीमेवरील सहाशे मैलांचा परिसरवादग्रस्त असून, या सीमेच्या दोन्ही बाजूंनी राहणारे लोक या भागातील जमीनीवर आणि पाण्याच्या स्त्रोतावर आपला हक्क सांगतात. यावरून या पूर्वीही दोन्ही देशांमध्ये हिंसक चकमकी झाल्या आहेत.

हे ही वाचा-ऐतिहासिक! अमेरिकेत तिसऱ्या महत्त्वाच्या पदी भारतीय वंशाच्या वनिता गुप्ता

पाण्याचे स्त्रोत असलेल्या ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते ते हटवण्याबाबत दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केली होती; पण नंतर ताजिकीस्ताननं हा करार मानण्यास नकार दिल्याचं किर्गीस्तानच्या बाटकन प्रांताच्या गव्हर्नरनी म्हटलं आहे.

दरम्यान, गुरुवारी रात्रीच दोन्ही बाजूंनी माघार घेण्याचे मान्य केले, परंतु त्यानंतर ही गोळीबार सुरू राहिल्याचं माध्यमांनी म्हटलं आहे. शुक्रवारी ताजिकिस्तानच्या संचार मंत्रालयानं एक निवेदन जारी करून दोन्ही देशांमधील सीमेवर युद्धबंदीची घोषणा केली. मात्र आपल्या बाजूच्या हानीबाबत ताजिकिस्तानने कोणतीही माहिती दिलेली नाही.

First published:

Tags: Water crisis