सॅंटा क्लॉजचं हे गाव तुम्ही पाहिलं का?

सॅंटा क्लॉजचं हे गाव तुम्ही पाहिलं का?

फिनलॅंडमध्ये सॅंटा क्लॉजचं हे गाव असून त्याचं नावच सॅंटा क्लोज व्हिलेज आहे.

  • Share this:

25  डिसेंबर: आज जगभर ख्रिसमस साजरा केला जातोय.  ख्रिसमस म्हटलं की सँटाक्लॉज आठवतो. पण या सँटाक्लॉजचं एक मुळ गावही आहे. फिनलॅंडमध्ये सॅंटा क्लॉजचं हे गाव  असून त्याचं नावच सॅंटा क्लोज व्हिलेज आहे.

फिनलँड या देशात सँटा क्लॉसचं  हे गाव आहे.  या गावाचं नावच सँटा क्लॉज व्हिलेज आहे.  फिनलंडच्या रोवानीमी शहरापासून 7 ते 8 किलोमीटरवर हे गावं आहे.  या गावाची अनेक वैशिष्ट्य आहेत. इथे जगभरातून सँटा क्लॉजला ५ लाखाहून जास्त पत्र येतात. ख्रिसमस जवळ आला की इथल्या पोस्ट ऑफिसमध्ये दिवसाला ३२ हजार पत्र येतात. हे गाव मोठं पर्यटन स्थळही आहे.  इथे दरवर्षी ३ लाखांपेक्षा जास्त पर्यटक येतात.

खरंतर, सँटा क्लॉजचं खरं मूळगाव कोर्वातुंतुरी आहे. पण ते कुठे आहे हे गूढ आहे. म्हणून मग, १९८५ साली फिनलँडमधल्या या गावाला अधिकृतपणे सँटा क्लॉस व्हिलेजचं नाव आणि दर्जा दिला गेला.

First published: December 25, 2017, 11:07 AM IST

ताज्या बातम्या