अशीही शिक्षा... या गावात राहतात फक्त रेपिस्ट!

अशीही शिक्षा... या गावात राहतात फक्त रेपिस्ट!

  • Share this:

15 मे : आपल्या देशात महिलांच्या सुरक्षेचा विषय हा कळीचा मुद्दा आहे. रोज घडणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना देशात आणि परदेशातही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. यासाठी वेगवेगळ्या देशात वेगवेगळे कायदे आणि सक्त नियमही आहेत. मात्र, अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतात बलात्कार करणाऱ्यांना विचित्र शिक्षा दिली जाते.

फ्लोरिडापासून 2 मैल अंतरावर एक छोटंसं गाव आहे. या गावात 200 लोकांची वस्ती आहे. हे लोक सामान्य लोक नसून अपराधी आहेत. या गावात अल्पवयीन मुलांवर किंवा महिलांवर अत्याचार करणारे अपराधी राहतात.

फ्लोरिडामध्ये लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाते. अशा लोकांना कोणतीही शाळा, बाग, बसस्टॉप किंवा सामान्य वसाहतीपासून दूर राहण्याचा आदेश दिला जातो. यामुळे हजारो लैंगिक अपराधी बेघर होतात. अशा अपराध्यांमध्ये सुधारण्याची इच्छा असलेल्या लोकांना एक संधी म्हणून शासनाने या गावाची निर्मिती केली आहे. याची निर्मिती 1960मध्ये झाली. इथे राहणारे लोक स्वत:चं पालन-पोषण स्वतःच करतात.

जरी अनेक नागरिकांचा या गावाला विरोध असला तरी अनेकांचं असं मत आहे की, इथे राहणारे अनेक लोक सुधारतात. एखाद्या महिलेसोबत तिच्या मनाविरूद्ध संबंध प्रस्थापित करणं हे जरी माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य असलं, तरी अशा अपराध्यांना दिलेली ही शिक्षा थोडी विचित्र पण विचार करायला लावणारी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2017 04:23 PM IST

ताज्या बातम्या