अमेरिकेचा चीनला पुन्हा दणका, सिनेटमध्ये भारताला पाठिंबा तर चीनच्या निषेधाचा ठराव

अमेरिकेचा चीनला पुन्हा दणका, सिनेटमध्ये भारताला पाठिंबा तर चीनच्या निषेधाचा ठराव

भारताने अतिशय संयमाने चिनच्या आक्रमक उचापतींना चोख उत्तर दिल्याचंही या ठरावात म्हटलं आहे.

  • Share this:

वॉशिग्टंन 14 ऑगस्ट: भारत आणि चीनमधल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने पुन्हा एकदा चीन विरोधात भूमिका घेतली आहे. अमेरिकन सिनेटमध्ये एक ठराव मांडून भारताला पाठिंबा व्यक्त करण्यात आला तर चीनच्या आक्रमक धोरणाचा निषेध करण्यात आला. रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर जॉन कॉर्निन आणि सिनेटच्या गुप्तचर निवड समितीचे सदस्य मार्क वॉर्नर यांनी हा ठराव मांडला आहे. हे दोघही नेते सिनेटच्या भारत विषयक समितीचे सदस्यही आहेत.

चीनचा विस्तारवाद वाढत असून चीन आपल्या शेजाऱ्यांशी कुरापती काढत आहे. भारताने अतिशय संयमाने चिनच्या आक्रमक उचापतींना चोख उत्तर दिल्याचंही या ठरावात म्हटलं आहे. गेल्या काही वर्षांपासून चीन आणि अमेरिकेमध्येही वाद सुरु असून अमेरिकेने आता भारताला जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.

पूर्व लडाखमधील (East Ladakh) वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) भारतीय लष्कर (Indian Army)तोपर्यंत तैनात आहे जोपर्यंत चीनी लष्कर त्यांच्या जागेवरून माघारी जात नाही असं भारताने ठणकावलं आहे. दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा सुरळीत करण्यासाठी चीनला 20 एप्रिलच्या आधीच्या परिस्थितीत जावं लागेल असं अनेकदा भारताकडून चीनला सांगण्यात आलं आहे. पण त्यावर चीनकडून कोणतीही पाऊलं उचलली गेली नाहीत.

चीनला सर्वात मोठा झटका देण्याची तयारी; गडकरींनी सांगितला काय आहे प्लान

आता भारताने एलएसीवर चिनी सैन्याच्या हालचालीकडे बारीक लक्ष ठेवण्यासाठी 4 ते 6 सॅलेटाइट लावण्याची तयारी करीत आहे. भारतीय सुरक्षा एजन्सीने सांगितल्यानुसार या सॅटेलाइटच्या माध्यमातून भारतीय सैन्याला चीनच्या हालचाली आणि विरोधी कारवायांवर नजर ठेवण्यात मदत होईल.

India-China Face off: लडाख सीमेवर तणाव संपवण्यासाठी चीनची 'ऑफर', पण भारत ठाम

संरक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एएनआयने सांगितले की भारतीय क्षेत्र आणि एलएसीवर खोल भागात चिनी दलांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हे सॅलेजाइट जरुरी आहेत. या सॅटेलाइट्समध्ये हाय रिजॉल्यूशन असणारे सेंन्सर आणि कॅमेरे आहेत. जे जवळून लक्ष देऊ शकतात. याच्या माध्यमातून छोट्यातील छोट्या गोष्टींवर आणि व्यक्तींवरही लक्ष ठेवता येईल.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 14, 2020, 11:10 PM IST

ताज्या बातम्या