मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

अमेरिका जगातल्या या देशांना मानतो दहशतवादाचं केंद्र, पाकिस्तानचा आहे का समावेश?

अमेरिका जगातल्या या देशांना मानतो दहशतवादाचं केंद्र, पाकिस्तानचा आहे का समावेश?

पाकिस्तानला दहशतवादी देश म्हणून घोषित करावं अशी भारताची मागणी आहे. संयुक्त राष्ट्रातही भारताने त्यासाठी पाठपुरावा केला होता.

पाकिस्तानला दहशतवादी देश म्हणून घोषित करावं अशी भारताची मागणी आहे. संयुक्त राष्ट्रातही भारताने त्यासाठी पाठपुरावा केला होता.

पाकिस्तानला दहशतवादी देश म्हणून घोषित करावं अशी भारताची मागणी आहे. संयुक्त राष्ट्रातही भारताने त्यासाठी पाठपुरावा केला होता.

    वॉशिंग्टन 16 डिसेंबर: दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांच्या यादीतून अमेरिकेने (USA) अलीकडेच सुदान (Sudan) या आफ्रिकी देशाला बाहेर काढलं आहे. त्यामुळे सुदानला दिलासा मिळाला आहे. इस्रायलला मान्यता दिल्याने  भेट म्हणून अमेरिकेने सुदानला या यादीतून वगळलं आहे. जे देश दहशतवाद पसरवण्यासाठी साह्य करतात, असं अमेरिकेला ठामपणे वाटतं, अशा देशांची यादी अमेरिकेने केली असून त्यात अनेक देशांचा समावेश आहे. अमेरिकेने 1993मध्ये सुदानचा या यादीत समावेश केला होता. या वर्षीच ऑक्टोबरमध्ये सुदानने इस्रायलला मान्यता देण्याच्या मुद्द्यावर सहमती दर्शवली होती. तसंच, दहशतवादी हल्ल्यांमध्ये मरण पावलेल्या आणि जखमी झालेल्या आपल्या देशातल्या नागरिकांच्या मदतीसाठी 225 दशलक्ष डॉलर देण्याची घोषणाही सुदानने केली होती. त्यानंतर, सुदानला या यादीतून काढलं जाऊ शकतं, अशा आशयाचं ट्विट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. अमेरिकेच्या या यादीला State Sponsors of Terrorism असं नाव आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांच्या या यादीत असलेल्या देशांना अमेरिकेची कोणतीच मदत मिळत नाही. राजकीय साह्य,  संरक्षणविषयक निर्यातीवर बंदी, दोन्ही बाजूंकडून होणाऱ्या निर्यातीवर कडक निर्बंध आदी गोष्टींचा त्यात समावेश असतो. तसंच, महासत्ता असलेली अमेरिका जर एखाद्या देशाला दहशतवाद पसरवणारा देश मानत असेल, तर त्या देशाला अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांकडूनही मदत मिळण्यात अडचणी निर्माण होतात. OMG! अवघ्या 8 आठवड्यांच्या चिमुरड्याला देणार तब्बल 16 कोटींचं एक इंजेक्शन म्हणूनच सुदान आणि आणखीही अनेक देशांनी या यादीतून आपल्याला हटवलं जावं, यासाठी बरेच प्रयत्न केले. या यादीतून हटवला गेलेला पहिला देश होता इराक. 1982मध्ये इराकला या यादीतून हटवण्यात आलं होतं; मात्र 1990मध्ये इराकने पुन्हा अमेरिकेला नाराज केल्याने त्या देशाचं नाव पुन्हा त्या यादीत समाविष्ट करण्यात आलं. त्यानंतर 2004मध्ये इराकचं नाव या यादीतून पुन्हा काढण्यात आलं आहे. त्यामुळे आता इराक या यादीत नाही. दक्षिण येमेनला 1990मध्ये अमेरिकेने या यादीतून काढलं. त्याकरिता दक्षिण येमेनला उत्तर येमेनसोबत चांगले संबंध प्रस्थापित करावे लागले. लीबिया हा आफ्रिकी देशही या यादीत होता. त्याला 2006मध्ये हटवण्यात आलं. क्यूबाला 2015मध्ये या यादीतून काढण्यात आलं. त्यानंतर आतापर्यंत या यादीतून कोणालाच काढण्यात आलं नव्हतं किंवा कोणत्या देशाचं नाव नव्याने वाढवण्यातही आलं नव्हतं. आता सुदानला या यादीतून काढल्यावर अमेरिकेच्या यादीत केवळ तीनच देश राहिले आहेत. त्यातला एक देश आहे इराण. इराणसोबत अमेरिकेचे संबंध तणावपूर्ण आहेत. तसंच हे दोन्ही देश परस्परांना हल्ल्याची खुली धमकी देत असतात. अलिकडेच मित्रराष्ट्रांनी विरोध करूनही अमेरिकेने इराणवरचे व्यापारी निर्बंध न हटवण्याचा पुनरुच्चार केला. त्यामुळे इराणशी शस्त्रास्त्रांचा व्यापार होऊ शकत नाही. हा देश हेलिकॉप्टर आणि क्षेपणास्त्रांची खरेदी करू शकत नाही. अशा स्थितीत इराणला या यादीतून हटवलं जाण्याची शक्यता सध्यातरी दिसत नाही. "मी Pfizer ची कोरोना लस घेणार नाही", फायझर कंपनीच्या CEO नीच दिला नकार दहशतवाद पसरवणाऱ्या देशांच्या या यादीत उत्तर कोरियाचंही नाव आहे. 1988मध्ये या देशाचं नाव या यादीत आलं, त्यानंतर ते काढण्यात आलं आणि 2017मध्ये पुन्हा ते यादीत समाविष्ट करण्यात आलं. अमेरिकेचे या देशासोबतचे संबंधही चांगले नाहीत. 'कंट्री रिपोर्ट्स ऑन टेररिझम'मध्ये म्हटलं आहे, की अनेक देशांमध्ये दहशतवाद पसरवण्यासाठी उत्तर कोरियाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली. दहशतवादी देशांना या देशाने शस्त्रास्त्रंही विकली. आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र करारात सहभागी होण्यास उत्तर कोरियाने नकार दिला. या देशाने आपल्या शत्रूला मारण्यासाठी व्हीएक्स या नर्व्ह एजंटचाही वापर केला, असा अमेरिकेचा आरोप आहे. आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र करारानुसार या गोष्टीवर बंदी आहे. 1979 साली या यादीत सीरियाला समाविष्ट करण्यात आलं. त्याचदरम्यान लीबियाही या यादीत आला होता; मात्र आता लीबियाला बाहेर काढण्यात आलं असून, सीरिया अद्यापही त्या यादीत आहे. अरब देशांत आलेल्या चळवळीच्या लाटेत दहशतवादाचा मोठा फटका बसलेला हा देश स्वतः पीडित आहे; मात्र या देशाचा दुसरा चेहराही आहे. या देशात दहशतवादी संघटना मोठ्या संख्येने असून, त्या संघटना संपूर्ण जगभर दहशतवादी कारवाया करत असतात. त्याशिवाय इथे रासायनिक शस्त्रं वापरली जाण्याचाही धोका आहे. ही शस्त्रं दहशतवादी वापरू लागले, तर मोठं नुकसान होऊ शकतं, अशी भीती अमेरिकेला आहे. त्यामुळेच सीरिया अमेरिकेच्या या यादीत आहे. बाकीचे देशही या देशावर कायम नजर ठेवून आहेत. पाकिस्तानला दहशतवादी देश म्हणून घोषित करावं अशी भारताची मागणी आहे. संयुक्त राष्ट्रातही भारताने त्यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र अमेरिकेने ही मागणी मान्य केलेली नाही.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: USA

    पुढील बातम्या