मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Afghanistan Crisis: अफगणिस्तानमधील नागरिकांची तालिबान्यांच्या दहशतीतून होणार सुटका; अरब देशाची मोठी घोषणा

Afghanistan Crisis: अफगणिस्तानमधील नागरिकांची तालिबान्यांच्या दहशतीतून होणार सुटका; अरब देशाची मोठी घोषणा

अफगणिस्तानमधील काबुल विमानतळावर दररोज हजारो संख्येने स्थानिक जमा होत आहेत. येथील नागरिक या देशात राहण्यास तयार नाहीत.

अफगणिस्तानमधील काबुल विमानतळावर दररोज हजारो संख्येने स्थानिक जमा होत आहेत. येथील नागरिक या देशात राहण्यास तयार नाहीत.

अफगणिस्तानमधील काबुल विमानतळावर दररोज हजारो संख्येने स्थानिक जमा होत आहेत. येथील नागरिक या देशात राहण्यास तयार नाहीत.

  • Published by:  Meenal Gangurde
अफगणिस्तान, 21 ऑगस्ट : दहशतवादी संघटना तालिबान यांना अफगणिस्तानमध्ये सत्ता स्थापन करण्यास यश मिळालं असलं तरी स्थानिक मात्र येथे राहण्यास तयार नसल्याचं दिसत आहे. दररोज हजारो नागरिक काबुल विमानतळावर दिसून येत आहे. दरम्यान अनेक देशांनी त्यांच्या मदतीसाठी हात पुढे केले आहेत. अशातच संयुक्त अरब अमिरातीचं (The United Arab Emirates) विदेश मंत्रालय आणि आतंरराष्ट्रीय सहयोग मंत्रालयाने शुक्रवारी रात्री मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितलं की, काबुलवर तालिबानने आणलेल्या (Taliban) नियंत्रणानंतर संयुक्त अरब अमीरात अफगानिस्तान (Afghanistan) मधून बाहेर काढण्यात आलेल्या 5 हजार अफगाण नागरिकांना तात्पुरता निवारा देतील. संयुक्त अरब अमीरातीच्या आंतरराष्ट्रीय सहयोग मंत्रालयाने शुक्रवारी रात्री उशिरा याबाबत घोषणा केली. अमेरिकेने आवाहन केल्यानंतर अमिरातीकडून अफगणिस्तानमधून आलेल्या 5 हजार लोकांना अस्थायी शरण देण्यासाठी तयार झाले आहेत. काही वेळानंतर या स्थलांतरितांना अन्य देशात पाठवलं जाईल. मंत्रालयाने सांगितलं की, येत्या काही दिवसात अमेरिकेच्या विमानातून त्यांना UAE आणण्यात येईल. 15 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा तालिबान्यांनी काबुलमध्ये प्रवेश केला होता. काबुलमध्ये घुसल्यानंतर तालिबानने अफगणिस्तावर नियंत्रण आणलं. याशिवाय गेल्या रविवारी रात्री अफगणिस्तानच्या (Afghanistan) राष्ट्रपती पॅलेसमध्ये (भवन) घुसले. इतकच नाही तर त्यांनी तेथून तालिबान्यांचा झेंडा फडकवला. हे ही वाचा-अफगणिस्तान संकटात, तर न्यूयॉर्कमध्ये आयुष्याचा आनंद घेतेय राष्ट्राध्यक्षांची लेक राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडला तालिबानी अफगणिस्तानमध्ये घुसरल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी (President Ashraf Ghani) यांनी अफगानिस्तान सोडला होता. त्याशिवाय आतंरराष्ट्रीय स्तरावरुन मान्यता घेत राष्ट्राध्यक्षांनी राजीनामा दिला. मात्र अफगणिस्तानमध्ये तालिबान्यांनी नियंत्रण मिळविल्यानंतर येथे नागरिक बाहेर जाण्यासाठी संघर्ष करीत आहे. काबुल शहरातून समोर आलेल्या अहवालांनुसार, हक्कानी नेटवर्कच्या सुमारे 6,000 जणांनी राजधानीच्या शहरावर ताबा मिळवला आहे. त्यांचे नेतृत्त्व दहशतवादी गटाचा प्रमुख अन तालिबानचा उपनेता सिराजुद्दीन हक्कानीचा भाऊ  अनस हक्कानी करत आहे. अनस हक्कानीने माजी राष्ट्रपती  हामिद करझई, HCNR चे अध्यक्ष अब्दुल्ला अब्दुल्ला आणि हिज्ब-ए-इस्लामीच्या गुलबुद्दीन हेतकमत्यारची भेट घेतली. यावरुन असा अंदाज बांधण्यात येत आहे की, असे मानले जाते की करझई आणि अब्दुल्ला या दोघांच्या हालचाली तालिबान्यांद्वारे प्रतिबंधित आणि नियंत्रित केल्या जात आहेत

First published:

Tags: Afghanistan, Taliban, UAE

पुढील बातम्या