चोरी करण्यासाठी घरात घुसला, लाखोंचे दागिने जमा केले, मात्र ACच्या हवेनं गाढ झोपला; सकाळी उठला तेव्हा....

चोरी करण्यासाठी घरात घुसला, लाखोंचे दागिने जमा केले, मात्र ACच्या हवेनं गाढ झोपला; सकाळी उठला तेव्हा....

चोर चोरीच्या उद्देशानं एका घरामध्ये शिरला. मात्र, घरात एसी पाहून तो तिथेच झोपून (Thief Slept in House) गेला. तो ज्या खोलीत झोपला ती खोली घर मालकाच्या मुलीची होती.

  • Share this:

 नवी दिल्ली 28 मार्च : चोरीच्या अनेक वेगवेगळ्या घटना आपण आजवर ऐकल्या किंवा वाचल्या असतील. मात्र, आज जी घटना समोर आली आहे, ती वाचून तुम्हाला हसूही आवरणार नाही आणि तुम्ही थक्कदेखील व्हाल. एक चोर चोरीच्या उद्देशानं एका घरामध्ये शिरला. मात्र, घरात एसी पाहून तो तिथेच झोपून (Thief Slept in House) गेला. तो ज्या खोलीत झोपला ती खोली घर मालकाच्या मुलीची होती. ही अजब घटना आहे थायलँडमधील.

द थाइगर डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना थायलँड सेंट्रलमधील आहे. एक बावीस वर्षीय युवक चोरीच्या उद्देशानं एका घरामध्ये घुसला खरा. मात्र, तिथे गेल्यानंतर त्याला झोप आल्यानं त्यानं खोलीतील एसी लावला आणि तिथे असणाऱ्या पलंगावर झोपी गेला. सकाळी उठल्यानंतर घराच्या मालकानं पाहिलं की खोलीतील एसी सुरू आहे आणि तिथे कोणीतरी झोपलेलं आहे तेव्हा ते हैराण झाले.

चोर ज्या खोलीमध्ये झोपला होता ती खोली घर मालकाच्या मुलीची होती. मात्र, मुलगी घरी नव्हती. घर मालकानं खिडकीमधून आतमध्ये डोकावून पाहिलं आणि पोलिसांना याबाबतची माहिती दिली. चोराला जेव्हा झोपेतून उठवलं तेव्हा त्याची प्रतिक्रिया अशी होती जसं काही त्याला काहीच माहिती नाही. विशेष बाब म्हणजे हा चोर ज्या घरामध्ये चोरीसाठी गेला होता त्या घराचा मालकही पोलिसच होता. या चोरानं घरातून अनेक किमती दागिने चोरले होते. मात्र, त्याला तिथेच झोप लागल्यानं हे सामान चोरी गेलं नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Published by: Kiran Pharate
First published: March 28, 2021, 11:38 AM IST

ताज्या बातम्या