2021 मध्ये परिस्थिती बिघडणार; कोरोनाबरोबरच या महासाथीसाठी दिला इशारा

2021 मध्ये परिस्थिती बिघडणार; कोरोनाबरोबरच या महासाथीसाठी दिला इशारा

कोरोनाबरोबरच या महासाथीशीही सामना करावा लागणार आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : वर्ल्ड फूड प्रोग्रामच्या (WFP) प्रमुखांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र एजेंसीला मिळालेल्या नोबेल शांति पुरस्कारांमुळे एजेन्सीला इतकं सामर्थ्य दिलं आहे की, ते जगभरातील नेत्यांना याबाबतीत इशारा देऊ शकतील की पुढील वर्ष या वर्षाच्या तुलनेत अधिक खराब असेल. यादरम्यान अरब डॉलरची सहाय्यता मिळाली नाही तर 2021 मध्ये भूकबळीची प्रकरणं मोठ्या संख्येने वाढतील.

डब्ल्यूएफपीचे प्रमुख डेविड बेस्ले यांनी सांगितले की, कोट्यवधी भुकेल्या लोकांना अन्न पुरवठा करण्यामुळे त्याच्या कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला… आणि जगालाही हा संदेश पाठवित आहेत  की परिस्थिती अधिकच खराब होत आहे… यासाठी अधिक काम करणे आवश्यक आहे.

हे ही वाचा-कोरोनानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची प्रकृती बिघडली; ICU मध्ये

बेस्ले गेल्या महिन्यात पुरस्काराबाबत म्हणाले की, ही अगदी योग्य वेळ आहे. ते म्हणाले की, अमेरिकन निवडणुका आणि कोविड - 19 महासाथीतील बातम्यांमुळे याकडे जास्त लक्ष दिलं जात नाही. सोबतच जगाचं लक्ष त्या समस्येकडे पोहोचलं नाही, ज्याचा आपण सामना करीत आहोत. त्यांनी सुरक्षा परिषदेत एप्रिल महिन्यात केलेले ते वक्तव्य आठवलं की, जग एका बाजूला महासाथीशी सामना करीत आहे आणि हे भूकबळीसारख्या महासाथीसारख्या आजाराशीही सामना करीत आहे.

याशिवाय जर तत्काळ कारवाई करण्यात आली नाही तर परिस्थिती अधिक बिघडू शकते. ते म्हणाले की, 2020 मध्ये हा विषय पुढे ढकलण्यात आम्हाला यश आले आहे. कारण यावेळी जागतिक नेत्यांनी निधी दिला, पॅकेजेस दिली. पण 2020 मध्ये मिळालेला निधी 2021 मध्ये मिळण्याची शक्यता कमी आहे. म्हणूनच ते याविषयी नेत्यांशी सतत बोलत असतात आणि ते आपल्याला भविष्यात ही परिस्थितीबद्दल अधिक खालावण्याची चेतावणी देत ​​आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: November 15, 2020, 8:09 PM IST

ताज्या बातम्या