मराठी बातम्या /बातम्या /विदेश /ग्राहकाला ही आईस्क्रिम देताना दुकानदारही घेतो मजा; पण ती तयार करतात तरी कशी?

ग्राहकाला ही आईस्क्रिम देताना दुकानदारही घेतो मजा; पण ती तयार करतात तरी कशी?

गेल्या काही दिवसांपासून काही विक्रेते विशिष्ट पध्दतीनं आईस्क्रीम विकत असल्याचे व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून काही विक्रेते विशिष्ट पध्दतीनं आईस्क्रीम विकत असल्याचे व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून काही विक्रेते विशिष्ट पध्दतीनं आईस्क्रीम विकत असल्याचे व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

    नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : आईस्क्रीम (Ice Cream) हा लहान मुलांसह मोठ्या माणसांचा अत्यंत आवडता पदार्थ. पार्टी असो वा सण-समारंभ मेन्यूमध्ये आईस्क्रीमचा समावेश असल्याशिवाय कोणतेही फंक्शन पूर्ण होत नाही. काही लोक घराबाहेर अगदी सहज भटकंती करायला गेले की आईस्क्रीम खाण्यास पसंती देतात. आज बाजारात आईस्क्रीमचे नानाविध प्रकार उपलब्ध आहेत. तसेच फ्लेवर्स देखील. असं हे आबालवृध्दांच्या आवडीचं आईस्क्रीम सोशल मीडियावर (Social Media) अनेक प्रकारे व्हायरल होत असतं. कधी रेसिपी म्हणून तर कधी त्याच्या वैशिष्टयपूर्ण विक्रीमुळं.

    गेल्या काही दिवसांपासून काही विक्रेते विशिष्ट पध्दतीनं आईस्क्रीम विकत असल्याचे व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका विशिष्ट दुकानात लोकांची आईस्क्रीमसाठी गर्दी दिसून आली असेल तर ती केवळ त्याच्या फनी (Funny) विक्री पध्दतीमुळं. आईस्क्रीम विक्री करणारा दुकानदार वैशिष्टपूर्ण टोपी परिधान करून उभा असतो. एका लांब स्टिकने (Stick) तो ग्राहकांना आईस्क्रीम देत असतो. पण होतं असं की आईस्क्रीम देताना ते स्टिकलाच चिटकून राहतं. त्यामुळे आईस्क्रीम खाण्यास उत्सुक असलेल्यांचा क्षणोक्षणी भ्रमनिरास होतो. मात्र विक्रेता समोरील व्यक्तीची चेष्टा करत असतो. अर्थात ही सर्व एक गंमत असते. याविषयीची माहिती `टीव्ही नाइन हिंदी`नं दिली आहे.

    असे व्हिडीओ बघताना या गंमतीचा आनंद घेतेवेळी हे आईस्क्रीम नक्की कसं तयार करतात की जे स्टिकला चिकटून राहतं. आईस्क्रीमचा कोन उलटा केला तरी ते खाली कसं पडत नाही, असा प्रश्न तुमच्या मनात नक्की आला असेल. `डीडब्ल्यू` च्या वृत्तानुसार, या आईस्क्रीमला मरास आईस्क्रीम (Maras Ice cream) असं म्हणतात. हे आईस्क्रीम इस्तंबुलमध्ये (Istanbul) खूप प्रसिध्द आहे. मात्र आता ते भारतात अनेक ठिकाणी मिळतं. हे आईस्क्रीम हळूहळू वितळतं आणि खाताना च्युंगमसारखं (Chew gum) लागतं. अर्थात ते तयार करतानाच विशिष्ट अशा पध्दतीनं बनवलं जातं. हे आईस्क्रीम तयार करणाऱ्यासाठी आवश्यक काही साहित्यावर बंदी घालण्यात आल्यानं आता दुसरं साहित्य या आईस्क्रीमसाठी वापरतात. हे आईस्क्रीम तयार करण्याची पध्दत तशी पारंपरिक आहे. यापूर्वी हे आईस्क्रीम हातानं तयार केलं जात. मात्र आता यासाठी यंत्रांचा वापर केला जातो. मागणी वाढल्यानं यंत्राचा वापर केला जात असल्यानं आता आईस्क्रीमही लवकर तयार होतं. यंत्राव्दारे आईस्क्रीम तयार केलं जात असलं तरी साहित्य मात्र नेहमीचंच वापरलं जातं.

    हे ही वाचा-बुलेटप्रुफ स्मार्टफोन! लुटारूंनी मारली गोळी, पण मोबाईलने वाचवला जीव

    हे आईस्क्रीम तयार करण्यासाठी सर्वप्रथम शेळी किंवा गायीचं दूध (Milk) आटवलं जातं. त्यामुळे ते खाताना काहीसं कठीण लागतं. त्यानंतर त्यात साखर टाकली जाते. तसेच खास तुर्कीश पध्दतीनं ऑर्किडच्या मुळांपासून तयार केलेलं मिश्रण त्यात घातलं जातं. त्यानंतर दूधाचं हे मिश्रण खूप वेळ एकत्र केल्यानंतर ते थंड केलं जातं.

    विशिष्ट वेळ हे मिश्रण थंड झाल्यानंतर ते क्रिमसारखं होतं. त्यानंतर ते उणे 40 अंश तापमानात ठेवलं जातं. त्यानंतर हे क्रिम एकत्र घुसळलं जातं. त्यानंतर प्लॅस्टिकसारखं लवचिक होईपर्यंत त्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्यानंतर ते विक्रीला ठेवलं जातं.

    अशा पध्दतीनं तयार केलेलं हे आईस्क्रीम काहीसं चिकट असल्यानं विक्रेता ग्राहकाला आईस्क्रीम देतेवेळी ते स्टिकलाच चिटकून राहतं आणि या गोष्टीची मजा ग्राहकांसह विक्रेताही घेतो.

    First published: