ओहयो, 30 नोव्हेंबर : अमेरिकेतील (America) ओहयोमधील (ohio) एका न्यायालयात सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी वारंवार आदेश देऊनही सातत्याने प्रमाणापेक्षा जास्त बोलणाऱ्या आरोपीस अखेर न्यायालयाने एक अनोखी शिक्षा सुनावली. प्रमाणापेक्षा जास्त बोलणाऱ्या या आऱोपीच्या तोंडाला पट्टी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ही शिक्षा नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली.
ओहियो येथील एका न्यायालयात सुनावणी सुरु होती. या सुनावणीदरम्यान आरोपी सातत्याने बोलत होता. न्यायाधीशांनी आरोपीस शांत राहण्याचे आदेश दिले. मात्र तरीही या आरोपीचं बोलणं काही थांबत नव्हतं. त्यामुळे सुनावणीत अडथळे येत होते. अखेरीस न्यायाधीशांनी आरोपीच्या तोंडाला पट्टी चिकटवण्याचे आदेश दिले.
हे ही वाचा-Shocking! Toilet मध्ये गेलेल्या तरुणीच्या गर्भातून अचानक निघालं बाळाचं डोकं आणि.
ही शिक्षा सुनावण्यापूर्वी न्यायाधीश जॅन रसो म्हणाले, की आरोपी फ्रँकलिन विलियम्स सातत्याने बोलत होता. त्याला शांत बसण्याची सूचना देऊनही त्याचे बोलणे थांबत नव्हते. त्यामुळे तो शांत राहावा या उद्देशाने असा आदेश देणे भाग पडले. न्यायाधीशांनी आदेश देताच आरोपीच्या तोंडाला पट्टी चिटकवण्यात आली.
या घटनेचा व्हिडीओ काही न्यूज चॅनेल्सवर ही दाखवण्यात आला आहे. या व्हिडीओत आरोपी विलियम्सने यावेळी नारंगी रंगाचा जंपसूट परिधान केला आहे. त्याला चोहोबाजूंनी पोलिसांनी घेरले असून त्याच्या हातात हातकडी आहे. यावेळी एक पोलीस अधिकारी पट्टीचे तुकडे करुन आरोपीच्या तोंडाला चिटकवत असल्याचे दिसते. विलियम्सवर तीन ठिकाणी दरोडा टाकल्याचा आरोप आहे. डिसेंबर 2017 मध्ये या गुन्ह्यात त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. या सुनावणीदरम्यान त्याच्या शिक्षेवर निर्णय होणार होता. पहिल्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान विलियम्स तुरुंगातून पळून गेला होता. मात्र, जुलै 2018 मध्ये त्याला पुन्हा अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायलयात हजर करण्यात आले होते.
हे ही वाचा-आधी वीज कापली, स्फोट केला आणि...64 जणांनी केली इराणच्या अणू शास्त्रज्ञांची हत्या
या सुनावणी दरम्यान आरोपी विलियम्स सलग 30 मिनिटे बोलत होता. न्यायाधीशांना त्याला बोलणे थांबवण्याबाबत वारंवार आदेश दिले. परंतु, आरोपी बोलणे थांबवत नसल्याने अखेरीस न्यायाधीशांनी मी फक्त तुमच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकणार आहे, असे सांगत आरोपीच्या तोंडाला पट्टी चिटकवण्याचे आदेश दिले. त्यानंतर न्यायाधीशांनी विलियम्सला दरोड्याच्या आरोपाखाली 24 वर्षांची शिक्षा सुनावली. एकूणच या सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी आरोपीचे बोलणे थांबवण्यासाठी दिलेला आदेश मात्र नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: United States of America