नववर्षानिमित्त रशियाचे राष्ट्राध्यक्ष करीत होते भाषण; TV वर चेहराचं दिसेना, प्रेक्षक हैराण

नववर्षानिमित्त रशियाचे राष्ट्राध्यक्ष करीत होते भाषण; TV वर चेहराचं दिसेना, प्रेक्षक हैराण

या घटनेनंतर रशियात गोंधळ उडाला आहे

  • Share this:

मॉस्को, 4 जानेवारी : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिनने दरवर्षी प्रमाणे यावर्षीदेखील आपल्या देशातील लोकांना नववर्षानिमित्ताने संबोधित केलं होतं. न्यूज चॅनेलच्या चुकीमुळे रशियातील काही भागात पुतिनचं अर्धवट चेहरा लोकांना पाहावा लागला. हा व्हिडीओ जेव्हा एका व्यक्तीने आपल्या घरी पाहिला त्यानंतर तो हैराण झाला. त्याने हा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यानंतर पुतिन यांचे हे चित्र सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागले. ही वृत्तवाहिनी रशियाच्या पश्चिमेस असलेल्या कालिनिनग्रॅड शहरातील आहे. जेव्हा कास्केस मीडिया ग्रुपने पुतिन यांचे नवीन वर्षाचे भाषण दाखवले, तेव्हा पुतिन यांचे डोळेच दिसत नव्हते आणि केवळ त्यांच्या चेहर्‍या खालील भाग दिसत होता. या माध्यम समूहाने आपल्या चुकीबद्दल प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त केली आहे.

टीव्ही स्टेशनच्या एडिटर्सना चूक समजताच त्यांना धक्का बसला. त्याने हे प्रसारण टीव्ही आणि इंटरनेटवरुन तातडीने काढून टाकले. या वाहिनीच्या मालकांनी सांगितले की तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकार घडला. तरी या घटनेचा तपास सुरू आहे. या प्रकरणात जो दोषी असेल त्याला शिक्षा केली जाईल. पुतिन यांच्या भाषणाच्या काही मिनिटांपूर्वी प्रांताच्या राज्यपालांनीही नवीन वर्षासाठी संदेश दिला, पण ते भाषण कोणत्याही अडचणीविना दाखवले गेले होते. यामुळे पुतिन यांचे भाषण केवळ तांत्रिक अडचणींचा विषय आहे की त्यांच्या विरोधातील राजकीय निषेधामुळे ते पाहिले गेले आहे का, असेही प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. बाल्टिक समुद्राजवळ लोकेशन असल्याकारणाने पुतिन यांचे भाषण कालिनिनग्रॅडमध्ये सर्वात शेवटी पाहायला मिळालं. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये हे भाषण दाखविल्याच्या तासाभरानंतर या भागातील लोकांना पुतिन यांचं भाषण ऐकायला मिळाले. पुतिन यांनी यावर्षी कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या समस्यांविषयी बोलले. तसेच त्यांनी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्‍यांचे कौतुक केले.

Published by: Meenal Gangurde
First published: January 4, 2021, 5:39 PM IST

ताज्या बातम्या