नवी दिल्ली, 2 ऑगस्ट : जगभरात आज Friendship Day साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना ऑनलाइनच मैत्रीचा दिवस साजरा केला.
अशातचं यंदा आंतरराष्ट्रीय मैत्रीची एक झलक पाहायला मिळाली. इस्त्राइलचे राष्ट्रपती रियूवेन रिवलिन यांनी मोदींनी ट्विट करुन मैत्री दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे- मैत्री दिवसानिमित्त माझ्याकडून तुम्हाला आणि भारतातील जनतेला खूप खूप शुभेच्छा..याशिवाय त्यांनी मोदींसोबतचा एक फोटोही पोस्ट केला आहे.
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही त्यांच्या शुभेच्छांना उत्तर दिलं. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की – धन्यवाद राष्ट्पुकी रियूवेन रिवलिन...माझ्याकडूनही तुम्हाला आणि इस्त्राइलमधील नागरिकांना शुभेच्छा...येत्या काळात भारत-इस्त्राइलमधील मैत्री अधिक घट्ट होवो, ही अपेक्षा. आज जगभरात मैत्रीचा दिवस मोठ्या आनंदात साजरा झाला. कोरोनाचा संकट काही वेळासाठी विसरुन मित्र-मैत्रिणी (ऑनलाइन) एकत्र आले. यानिमित्ताने आपल्या जुन्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला.