मराठी बातम्या /बातम्या /विदेश /13 हजार किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या कबुतराचा ऑस्ट्रेलिया सरकार बळी देणार?

13 हजार किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या कबुतराचा ऑस्ट्रेलिया सरकार बळी देणार?

अमेरिकेहून (America) एक कबुतर 13 हजार किलोमीटरचा प्रवास करून थेट ऑस्ट्रेलियाच्या (Australia) मेलबर्न (Melbourne) शहरात दाखल झालं आहे. त्यामुळे जैविक दक्षतेच्या (Biological efficiency) पार्शवभूमीवर लवकरच या कबुतराला ऑस्ट्रेलिया सरकार (Australia Government) संपवणार असल्याची माहिती आहे.

पुढे वाचा ...

मेलबर्न, 15 जानेवारी : चीन (China) मधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण  जगाचा समतोल बिघडवला. म्हणून आता प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीची खबरदारी घेतली जात असल्याचं चित्र आहे. काही दिवसापूर्वी ऑस्ट्रेलियातील (Australia) मेलबर्न (Melbourne) शहरात एक कबुतर (Pigeon) दाखल झालं आहे. या कबुतरांच्या पायात निळ्या रंगाचा बँड (Blue Band) बांधला असून, हा कबुतर अमेरिकेहून (America) 13 हजार किलोमीटरचा प्रवास करून आल्याचं बोललं जात आहे.

मिळालेल्या  माहितीनुसार, या कबुतराचे नाव 'जो' आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हा पांढरा कबूतर अमेरिकेच्या ओरेगॉन (Oregon) येथे कबूतर शर्यतीत सामील झाला होता. शर्यती दरम्यान, कबूतर भटकला आणि  13 हजार किलोमीटरचा प्रवास करून ऑस्ट्रेलियात दाखल झाला.

ऑस्ट्रेलिया सरकारच्या (Australia Government) मते, हे कबूतर जीवशास्त्रीय सुरक्षिततेसाठी (Biological Protection) धोकादायक असू शकते. या एका कबुतरांच्या येण्यामुळे संपूर्ण ऑस्ट्रेलियामध्ये रोग पसरु शकण्याची भीती आहे. म्हणून या कबुतराला वेळीच संपवणे हा योग्य निर्णय असेल, असं मत अप्रत्यक्षपणे ऑस्ट्रेलिया सरकारने दर्शवलं आहे.

(वाचा - रतन टाटांचा आणखी एक PHOTO व्हायरल, कारण वाचून तुम्हीही कराल सलाम)

ऑस्ट्रेलियाच्या या भूमिकेनंतर अमेरिकेतील, अमेरिकन रेसिंग पिजन यूनियन, स्पोर्ट्स डेव्हलपमेंट मॅनेजर डायऑन रॉबर्ट्स म्हणाले की, कबूतरच्या पायाला बांधलेला निळा बँड बनावट आहे. ऑस्ट्रेलियामध्ये आढळलेला कबूतर अमेरिकन निळ्या रंगाच्या बँड असलेल्या कबूतरांपेक्षा वेगळा आहे. अद्याप शर्यतीमध्ये सामील झालेल्या कबूतरचा आम्ही शोध घेऊ शकलो नाही, पण ऑस्ट्रेलियात सापडलेलं हे कबुतर अमेरिकेचं नाही हे मी खात्रीने सांगू शकतो. तसंच हे कबुतर शर्यतीत सामील झालेलं कबुतर असतं, तर आम्ही त्याच्या बँडने लगेच त्याला ओळखल असतं.

अमेरिकेच्या या सप्ष्टीकरणानंतर या कबुतराचं नेमकं काय केलं जाईल, हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या सरकारच्या कृषी विभागाने अद्यापी गुलदस्त्यात ठेवला आहे.

First published:

Tags: Australia, United States of America