भारतात Oxfordच्या लशीची चाचणी थांबणार का? कंपनीने केला खुलासा
भारतात Oxfordच्या लशीची चाचणी थांबणार का? कंपनीने केला खुलासा
भारताला प्रत्येक नागरीकाला एक डोज द्यायचा द्यायचा असेल तर किमान 130 कोटींपेक्षा जास्त डोज लागणार आहेत. त्यामुळे त्याचा खर्च आणि उत्पादन हे मोठं आव्हान असणार आहे.
ही लस भारतात तयार होणार असून पुण्यात सीरम इन्स्टिट्यूट त्याचं उत्पादन करणार आहे.
लंडन 09 सप्टेंबर: Oxfordच्या कोरोना लशीच्या चाचण्यांकडे सर्व जगाचं लक्ष लागलं आहे. या लशीच्या दोन टप्प्यांचे परिणाम सकारात्मक आले आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातल्या मानवी चाचण्यांकडे आशेने पाहिलं जात आहे. मात्र तिसऱ्या टप्यातल्या चाचण्या सुरू असतांनाच त्या तात्पुरत्या थांबविण्यात आल्या आहेत. ज्यांची या चाचण्यांसाठी निवड करण्यात आली त्यापैकी एकाला ही लस दिल्यानंतर काही त्याची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे तत्काळ हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीने म्हटलं आहे.
दरम्यान, भारतात पुण्यासह काही शहरांमध्ये Oxfordच्या लशीच्या चाचण्या सुरू आहे. ब्रिटनमधल्या चाचण्या तात्पुरत्या थांबल्याने त्याचा भारतातल्या चाचण्यांवर काही परिणाम होणार का? असा सवाल विचारला जात होता. त्यावर कंपनीने खुलासा केला असून भारतातल्या चाचण्या सुरूच राहणार आहेत असं म्हटलं आहे. त्या चाचण्यांना काहीही अडचण नाही असंही कंपनीने म्हटलं आहे.
Oxford लंडनच्या एका फार्मा कंपनीसोबत ही लस विकसित करत आहे. भारतासह काही देशांमध्ये त्याच्या चाचण्या सुरू आहेत. ज्या व्यक्तिची प्रकृती बिघडली त्याला काही तरही आजार होते. त्यामुळे त्या कारणांचा शोध सुरू आहे. त्याची माहिती मिळाली की या चाचण्या पुन्हा सुरू केल्या जातील.
कुठल्याही चाचणी दरम्यान येणारी ही अडचण आहे. त्यात मोठं असं काहीही नाही असंही कंपनीने म्हटलं आहे. ही लस भारतात तयार होणार असून पुण्यात सीरम इन्स्टिट्यूट त्याचं उत्पादन करणार आहे.
चिंता वाढली! पुन्हा नवीन रुग्णांची संख्या 90 हजारांच्या घरात
अॅस्ट्रा झिनेका (AstraZeneca) कंपनीच्या मदतीने ऑक्सफर्ड ही लस तयार केली आहे. भारतातील पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटनेही (Pune serum institute) ऑक्सफर्डच्या लशीसंदर्भात करार केला आहे.
We can't comment much on the UK trials, but they have been paused for further review and they hope to restart soon. As far as Indian trials are concerned, it is continuing & we have faced no issues at all: Serum Institute of India on reports on AstraZeneca halting the trials. https://t.co/gL7IirfnXy
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषधं निर्माण करणारी कंपनी आहे. औषध निर्माण करणारी जगातली सर्वोत्तम संस्था म्हणून ओळखली जाते. सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ आदर पुनावाला यांनी याआधी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, "ऑक्सफर्डची या लशीची प्राण्यांवर चाचणी यशस्वी झाली आणि आता मानवी चाचणीतदेखील ही लस प्रगतीपथावर आहे.
Coronavirus राज्याची स्थिती भीषण; 3 जिल्ह्यातच आहेत सव्वा लाख अॅक्टिव्ह पेशंट्स
त्यामुळे आम्ही या लशीचं उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला." ही लस फक्त 1000 रुपयापर्यंत उपलब्ध होईल असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.