Home /News /videsh /

कोरोनावरील पहिल्या औषधाची 'या' देशाकडून अधिकृत घोषणा, फक्त 4 दिवसांमध्ये बरा होणार आजार

कोरोनावरील पहिल्या औषधाची 'या' देशाकडून अधिकृत घोषणा, फक्त 4 दिवसांमध्ये बरा होणार आजार

मात्र आता रशियात सर्व सामान्यांसाठी ही लस उपलब्ध होणार असल्याने त्याच्या प्रयोग आणि निष्कर्षांकडे सर्व जगाचं लक्ष लागलं आहे.

मात्र आता रशियात सर्व सामान्यांसाठी ही लस उपलब्ध होणार असल्याने त्याच्या प्रयोग आणि निष्कर्षांकडे सर्व जगाचं लक्ष लागलं आहे.

अधिकृतरित्या एका औषधाची घोषणा करण्यात आली असून देशातील विविध भागात हे औषध उपलब्ध करून देण्यात येत आहे.

    मुंबई, 12 जून : जगभरातील विविध देशांमध्ये कोरोनाचं थैमान सुरू आहे. रशियामध्येही कोरोनाबाधितांचा आकडा 5 लाखांहून अधिक झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी रशियाकडून अधिकृतरित्या एका औषधाची घोषणा करण्यात आली असून देशातील विविध भागात हे औषध उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोरोनावर अद्याप कोणतीही लस आलेली नाही. मात्र रशियाकडून कोरोनावरील उपचारासाठी एविफेविर या अ‍ॅण्टी व्हायरल औषधाच्या वापराला सुरुवात झाली आहे. देशातील जवळपास सर्व भागात या औषधाचा पुरवठा करण्यासंबंधी करार करण्यात आला आहे. औषधा विषयी रशियामधील RDFI या मंडळाने माहिती दिली आहे. तसंच एविफेविर औषधाचा वापर करणारे काही रुग्ण 4 दिवसांमध्ये बरे झाल्याचा दावाही या मंडळाकडून करण्यात आला आहे. याबाबत 'हिंदुस्तान टाइम्स'ने वृत्त दिलं आहे. 10 देशांकडून मागणी दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या आकड्यामुळे अनेक देश हतबल झाले आहेत. लॉकडाऊन आणि इतर काही उपाययोजनांनंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बहुतांश देशांनी हात टेकले आहेत. अशातच रशियात या अ‍ॅण्टी व्हायरल औषधाचा वापर सुरू झाल्यानंतर जगभरातील तब्बल 10 देशांनी रशियाकडे या औषधाची मागणी केली आहे. दरम्यान, कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करणाऱ्या लसींचे संशोधन काही देशांमध्ये सुरू आहे. लस विकसित करण्यासाठी आणि बाजारात उपलब्ध करून देण्यासाठी अनेक कंपन्यांनी कंबर कसली असून जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन कंपनीने आशेचा किरण दाखवला आहे. कोरोनाला अटकाव करणारी लस तयार असून पुढील महिन्यात मानवांवर चाचणी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेत दररोज हजारो बाधित आढळत असून करोनाचे थैमान सुरू आहे. करोनाबाधितांची संख्या 20 लाखांहून अधिक झाली असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणूक प्रचार सभांना सुरुवात करणार असल्याचे जाहीर केले आहे. भारतात काय आहे स्थिती? भारतात हळहळू लॉकडाउन शिथिल करण्यात येत असला, तरी वाढत चालेल्या रुग्णांच्या संख्येमुळे चिंतेत भर पडत आहे. त्यामुळे लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय हानिकारक ठरण्याची शक्यता आहे. एका संस्थेनं केलेल्या अभ्यासातून भारतासाची काळजीत भर टाकणारे निष्कर्ष समोर आले आहे. जपानस्थित सुरक्षेसंबंधित नोमुरा संस्थेनं कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर देशातील 45 अर्थव्यवस्थांचा अभ्यास केला आहे. यात भारत ‘डेंजर झोन’मध्ये (धोकायदायक श्रेणी) असल्याचं म्हटलं आहे. भारतात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती असून, लॉकडाउन लागू होऊ शकतो, असं नोमुरानं म्हटलं आहे. संपादन - अक्षय शितोळे
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या