Home /News /videsh /

निष्काळजीपणामुळे परिस्थिती बिघडली, अमेरिकेत एका दिवसात 10,000 हून अधिक कोरोनाबाधित

निष्काळजीपणामुळे परिस्थिती बिघडली, अमेरिकेत एका दिवसात 10,000 हून अधिक कोरोनाबाधित

अमेरिकेतील नागरिकांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्याकडे इतकी भयावह परिस्थिती ओढवली आहे

    वॉशिंग्टन, 24 मार्च : अमेरिकेत कोरोना विषाणूचा (Coronavirus) फैलाव वाढण्यामागे देशातील आरोग्य एजन्सीच्या स्तरावर झालेले दुर्लक्ष मानलं जात आहे. असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेनुसार, जंगलात लागलेल्या आगीप्रमाणे या साथीच्या आजाराने संपूर्ण अमेरिकेत (America) हा रोग परसला. आतापर्यंत अमेरिकेत सुमारे 44 हजार लोक संक्रमित झाले आहेत आणि 560 लोक मरण पावले आहेत. एकाच दिवसात 10,000 हून अधिक नवीन कोरोनाबाधित (Covid - 19) रुग्ण नोंदवले गेले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आवश्यक वैद्यकीय साहित्य आणि संरक्षणात्मक उपकरणे पोहोचवित आहेत. संबंधित - जिवंत प्राणी खाणं ठरतंय धोकादायक? कोरोनानंतर चीनमध्ये हंता विषाणूने एकाचा मृत्यू ट्रम्प यांनी या महिन्याच्या सुरुवातीस अमेरिकन नागरिकांना आश्वासन दिले होते की, सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एंड प्रिव्हेंशन (सीडीसी) द्वारा विकसित केलेली तपासणी चांगली आहे. कोणीही तपासणी करू शकतं. मात्र दोन महिन्यांपूर्वी पहिलं प्रकरण समोर आल्यानंतरही अमेरिकेत बरीच लोकांची तपासणी होऊ शकलेली नाही. यूएस हेल्थ एजन्सी सीडीसीच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, गेल्या फेब्रुवारीमध्ये अमेरिकेत कोरोना विषाणूची मुळं जमली होती. त्या काळात सरकारी प्रयोगशाळेत केवळ 352 लोकांची चाचणी घेण्यात आली. संबंधित - कोरोनाच्या लढाईत पोलीस पत्नी खंबीरपणे पाठीशी, एका दिवसात शिवले तब्बल 500 मास्क डोळे बांधून लढाई करू शकत नाही अमेरिकेत दररोज सरासरी एक डझन चाचण्या केल्या जातात. आता आरोग्य व मानव सेवा विभागाने आपल्या चुकांचे मूल्यांकन करण्यासाठी अंतर्गत आढावा सुरू केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अदनोम घेबरेसस म्हणाले, 'तुम्ही डोळे बांधून लढाई करू शकत नाही. कुणाला संसर्ग झाला हे माहित नसेल तर ही महामारी थांबवू शकत नाही. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, 'कोरोना विषाणूच्या उपचारांसाठी अँटी-मलेरिया औषधांची चाचणी घेण्यात येत आहे. ही औषधे 'गॉड गिफ्ट्स' असू शकतात. मात्र अद्याप तरी हे सिद्ध झालेलं नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Donald Trump

    पुढील बातम्या