वॉशिंग्टन, 29 ऑक्टोबर : अमेरिकेत या वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक (U S presidential election) इतिसाहासातील सर्वात महागडी निवडणूक असल्याचे सांगितले जात आहे. या निवडणुकीत गेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या तुलतेन दुप्पट पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. यंदा तब्बल 14 अरब डॉलर खर्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शोध समूह 'द सेंटर फॉर रेस्पॉनसिव पॉलिटिक्स' नी सांगितलं की मतदानापूर्वीच्या महिन्यात राजकीय निधीमध्ये मोठी वाढ झाली आहे. याकारणामुळे या निवडणुकीत जी 11 अरब डॉलर खर्च होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, ती मागे पडली आहे.
इतका मोठी निधी प्राप्त करणारे बायडन पहिले उमेदवार
शोध समूहाने सांगितलं की, 2020 च्या निवडणुकीत 14 अरब डॉलर खर्च होण्याची शक्यता आहे. यामुळे गेल्या निवडणुकीत खर्च केलेले सर्व रेकॉर्ड मागे पडले आहे. समुहानुसार डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले उमेदवार आहेत ज्यांना दान देणाऱ्यांनी 1 अरब डॉलर इतका निधी दिला. ट्रम्प यांना 59.6 कोटी डॉलर मिळाले आहेत.
त्यांच्या प्रचार मोहिमेला 14 ऑक्टोबरला 93.8 कोटी डॉलर मिळाले आहेत. ज्यामध्ये डेमोक्रेटचा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना हरविण्यासाठी मोठा प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे ट्रम्प यांनी दान देणाऱ्यांकडून 59.6 कोटी डॉलरचा निधी निवडणुकीच्या प्रचारासाठी जमा केला आहे.
हे ही वाचा-'या' देशात वाढतोय कोरोनाचा सर्वाधिक धोक, पुन्हा एकदा केली लॉकडाऊनची घोषणा
महिलांनी दान देण्याचा रेकॉर्ड तोडला
शोध समूहाचे म्हणणं आहे की, कोरोनाची महासाथ असतानाही 2020 च्या निवडणुकीत रेकॉर्ड तोड निधी दिला गेला आहे. यामध्ये उद्योगपतींबरोबरच सर्वसामान्यांचाही समावेश आहे. समुहाने दिलेल्या माहितीनुसार यंदा महिलांनी मोठ्या संख्येने दान दिलं आहे.