चीनमधून कोरोना व्हायरस आणला म्हणून कोरियाच्या राजाने थेट घातल्या गोळ्या

चीनमधून कोरोना व्हायरस आणला म्हणून कोरियाच्या राजाने थेट घातल्या गोळ्या

संपूर्ण जग कोरोनाव्हायरशी लढा देत असताना भारताने हा लढा जिंकलेला आहे

  • Share this:

दक्षिण कोरिया, 14 फेब्रुवारी : सध्या जगभरात कोरोना व्हायरसचा (Corona Virus) कहर वाढत आहे. उत्तर कोरियाचा शासक किम जोंग उन (kim jong ung) यांच्या हुकूमशाही पद्धतींविषयी सर्वांना माहिती आहे. येथे एका छोट्या चुकीलासुद्धा मृत्यूदंड दिला जातो. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे जगभरात उपचार शोधण्याचा प्रयत्न केला जात असताना उत्तर कोरियामध्येही (north korea) कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे.

नव्या अहवालानुसार, कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या संशयावरून उत्तर कोरियाच्या एका अधिकाऱ्याला स्वतंत्र  केंद्रात स्वतंत्र ठेवण्यात आलं होते. परंतु या अधिकाऱ्याने चुकून सार्वजनिक शौचालयाचा वापर केला, ज्यामुळे त्याला जीव गमवावा लागला आहे.

दक्षिण कोरियाचे वृत्तपत्र डोंग-ए-इल्बो न्यूजनुसार, या व्यक्तीला चीनमधून परत आल्यानंतर पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. सार्वजनिक शौचालयाचा वापर केल्यामुळे या अधिकाऱ्याला कोरोना व्हायरसचा  संसर्ग पसरवण्यास आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले. नंतर त्याला थेट गोळ्या घालून ठार मारण्यात आले. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन यांनी परवानगीशिवाय संक्रमित लोकांसाठी असलेल्या स्वतंत्र ठिकाण सोडणाऱ्यावर कारवाई करण्याचा संकल्प केला आहे. यूके मिररच्या वृत्तानुसार, उत्तर कोरियाच्या राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीच्या आणखी एका अधिकाऱ्यालाही चीन भेटीची माहिती लपवल्याबद्दल देशातून हद्दपार केले आहे.

दक्षिण कोरियन मीडियाच्या वृत्तानुसार उत्तर कोरियामध्ये कोरोना विषाणूची अनेक प्रकरणे झाली आहेत आणि त्यातून बऱ्याच लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. प्योंगयांगमधील जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांचे  म्हणणे आहे की, अद्याप त्यांना कोरोनाचा कोणताही रुग्ण सापडलेले नाही. तर दुसरीकडे संपूर्ण जग कोरोनाव्हायरशी (Coronavirus) लढा देत असताना भारताने (India) हा लढा जिंकलेला आहे. केरळातील दुसऱ्या रुग्णाला (गुरुवारी) डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. अलाप्पुझा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये (Alappuzha Medical college hospital) त्याच्यावर उपचार सुरू होते. चीनच्या (China) वुहानमध्ये (Wuhan) केरळाचा हा विद्यार्थी शिकत होतो. 24 जानेवारीला तो वुहानहून केरळात परतला. 2 फेब्रुवारीला त्याच्या रक्ताचे नमुने कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह होते. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्टुयट ऑफ व्हायरोलॉजीमधून (National Instiute of Virology) कोरोनाव्हायरसच्या रुग्णाच्या रक्ताचे नमुने आता नेगेटिव्ह (negative) आलेत. दोनदा नेगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर या रुग्णाला घरी सोडण्यात आलं आहे, असं वृत्त एएनआय (ANI) दिलं आहे.

First published: February 14, 2020, 3:02 PM IST

ताज्या बातम्या