मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

कोर्टाचा अजब निर्णय, पाहिल्यांदा पाळी आली म्हणून 14 वर्षीय मुलीच्या लग्नाला मान्यता

कोर्टाचा अजब निर्णय, पाहिल्यांदा पाळी आली म्हणून 14 वर्षीय मुलीच्या लग्नाला मान्यता

यावेळी कोर्टाने विवाहाला वैध मानण्यामागे 'हे' कारण सांगितलं आहे

यावेळी कोर्टाने विवाहाला वैध मानण्यामागे 'हे' कारण सांगितलं आहे

यावेळी कोर्टाने विवाहाला वैध मानण्यामागे 'हे' कारण सांगितलं आहे

  कराची, 8 फेब्रुवारी : पाकिस्तानातील (Pakistan) एका न्यायालयाने 14 वर्षाच्या एका शीख मुलगी आणि तिचे अपहरण करणारा व्यक्ती या दोघांमधील लग्नाला वैध करार दिला आहे. कोर्टाने सांगितले की, शरियत कायद्यानुसार जर मुलीचा मासिक धर्म सुरू झाला असेल तर तो कमी वयाच्या मुलीचा विवाह मान्य करण्यात आला आहे. हुमा असं या मुलींच नाव आहे. हुमाचे अपहरण केल्यानंतर तिला जबरदस्तीने मुस्लीम धर्म स्वीकारावयास लावले आणि अपहरणकर्त्याने हुमासोबत विवाहासाठी जबरदस्ती केली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर पीडित मुलीचे पालक सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहेत. उच्च न्यायालयाने आपल्या निकालात सांगितले की, शरियत कायद्यानुसार अल्पवयीन मुलीचा मासिक धर्म सुरू झाल्याने तिचे लग्न वैध मानले जाते. पीडिताचे वडील यूनिस आणि आई नगीना मसीह यांनी सांगितल्यानुसार, गेल्या ऑक्टोबरमध्ये जेव्हा हुमाचे अपहरण झाले होते, तेव्हा ती 14 वर्षांची होती. तिचे अपहरण करणाऱ्या अब्दुल जब्बारने तिला मुस्लीम धर्म स्वीकारावयास लावले आणि तिच्याशी जबरदस्तीने लग्न केले. सिंध उच्च न्यायालयाने हुमा अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही अपहरणकर्त्यासोबतचा विवाह वैध मानला आहे. पीडिताचे वकील तबस्सुम यूसुफ यांनी शुक्रवारी सांगितले की, ते उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. अन्य बातम्या

  Valentine Week मध्ये पुणे पोलिसांनी तरुणाला दिलं ‘लय भारी गिफ्ट’

  महिला सब-इन्स्पेक्टरची PSIने केली हत्या, त्याच पिस्तुलाने स्वत:चाही संपवला जीव

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: #pakistannews

  पुढील बातम्या