Home /News /videsh /

भारतीय अब्जाधीशाला अवघ्या 73 रुपयात विकावी लागली 2 अब्ज डॉलर्सची कंपनी; कारण वाचून बसेल धक्का

भारतीय अब्जाधीशाला अवघ्या 73 रुपयात विकावी लागली 2 अब्ज डॉलर्सची कंपनी; कारण वाचून बसेल धक्का

कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल..

    अबुधाबी, 19 डिसेंबर : संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीय वंशाचे अब्जाधीश बीआर शेट्टी यांची फिनाब्लर पीएलसी कंपनी आपला व्यवसाय इस्त्राईल-युएई कन्सोर्टियम यांना अवघ्या एका डॉलरमध्ये (73.5२ रुपये) विकत आहेत. (Indian origin billionaire sold company for rs 73 rupees) गेल्या वर्षापासूनच त्यांच्या व्यवसायाला उतरती कळा सुरू झाली होती. त्यांच्या कंपनीवर कोट्यवधी डॉलर्स कर्ज तर आहेच शिवाय त्यांच्याविरूद्ध फसवणुकीचीही चौकशी सुरू आहे. गेल्या डिसेंबरमध्ये त्यांच्या व्यवसायाचे बाजार मूल्य एक अब्ज डॉलर इतके होते. तर दुसरीकडे त्यांच्या एक अरब डॉलरचं कर्ज असल्याचे सांगितले जात होते. बीआर शेट्टी यांची वित्तीय सेवा कंपनी फिनाब्लरने जाहीर केले की, ते ग्लोबल फिनटेक इन्व्हेस्टमेंट होल्डिंगबरोबर करार करत आहेत. जीएफआयएच इस्त्राईलच्या प्रिझम ग्रुपची सहाय्यक कंपनी आहे. जिथून फिनाब्लर पीएलसी लिमिटेड आपल्या सर्व मालमत्तेची विक्री करीत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये फिनाब्लरचे बाजार मूल्य दोन अब्ज डॉलर्स इतके होते. यावर्षी एप्रिलमध्ये कंपनीने शेअर केलेल्या माहितीनुसार, त्यावर एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कर्ज आहे. सांगितले जात आहे की संयुक्त अरब अमिराती व इस्राईलच्या कंपन्यांमधील महत्त्वपूर्ण व्यापारी व्यवहारांबाबतही हा करार आहे. बीआर शेट्टी यांनी युएई एक्सचेंज, 1980 मध्ये अमिरातीमधील सर्वात जुना रेमिटन्स व्यवसाय सुरू केला होता. युएई एक्सचेंजमध्ये यूके-आधारित एक्सचेंज कंपनी ट्रॅव्हलेक्स आणि अनेक लहान पेमेंट सोल्यूशन्स प्रदात्यांसह आणि शेट्टीज फिनब्लर यांच्यासमवेत 2018 मध्ये सार्वजनिक झाले. केवळ आठ डॉलर्स घेऊन यूएईला पोहोचले 77 वर्षीय शेट्टी युएईमध्ये आरोग्य सेवा क्षेत्रात भरपूर संपत्ती मिळवणारे पहिले भारतीय आहेत. 1970 मध्ये त्यांनी एनएमसी हेल्थची सुरुवात केली. जी पुढे जाऊन 2012 मध्ये लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध होण्यापूर्वी देशातील अशा प्रकारची पहिली कंपनी बनली. शेट्टी हे 70 च्या दशकात युएईमध्ये अवघ्या आठ डॉलर घेऊन आले होते आणि वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून करिअरला सुरुवात केली असे म्हणतात.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Viral

    पुढील बातम्या