• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • भांडण झालं अन् तिने बॉयफ्रेंडला मोबाइल फेकून मारला, रुग्णालयात दाखल केलं आणि..

भांडण झालं अन् तिने बॉयफ्रेंडला मोबाइल फेकून मारला, रुग्णालयात दाखल केलं आणि..

तो फोन त्याच्या डोक्यावर लागला. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं; मात्र त्याचा मृत्यू झाला.

तो फोन त्याच्या डोक्यावर लागला. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं; मात्र त्याचा मृत्यू झाला.

तो फोन त्याच्या डोक्यावर लागला. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं; मात्र त्याचा मृत्यू झाला.

 • Share this:
  अर्जेंटिना, 25 सप्टेंबर : कपल्समध्ये (Couples) भांडणं होणं ही काही नवी किंवा वेगळी गोष्ट नाही. ती तर नॉर्मल गोष्ट आहे. दोन वेगवेगळी माणसं एकत्र आली की भांड्याला भांडं लागायचंच; पण छोट्या वादांचं किंवा भांडणांचं रूपांतर मारहाणीत (Fight in Couples) झालं तर मात्र धोकादायक ठरू शकतं. अर्जेंटिनातल्या एका तरुणीला आपल्या प्रियकराशी मारामारी करणं खूपच महागात पडलं. या भांडणादरम्यान त्या तरुणीने आपल्या प्रियकराला मोबाइल फोन (attacked lover with mobile) फेकून मारला. डोक्याला मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी 22 वर्षांच्या या तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोक्साना अॅडेलिना लोपेझ असं तिचं नाव आहे. रोक्सानावर (Roxana) आता अर्जेंटिनातल्या क्रिमिनल कोर्टात (Criminal Court in Argentina) खटला सुरू आहे. तपास सुरू असेपर्यंत त्या तरुणीला जामिनावर सोडण्यात आलं आहे. लुईस दारिओ गुआंटे (Louis) असं तिच्या प्रियकराचं नाव होतं. रोक्साना आणि लुईस यांच्यामध्ये कोणत्या तरी कारणावरून भांडण सुरू होतं. त्यात लुईसने रोक्सानावर हात उचलला. रागाच्या भरात रोक्सानाने इकडे तिकडे करताना तिच्या हाती मोबाइल लागला. तो मोबाइल तिने लुईसला फेकून मारला. तो फोन त्याच्या डोक्यावर लागला. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं; मात्र त्याचा मृत्यू झाला. रात्रीचे जेवण आणि शांत झोपेचा आहे असा संबंध; चांगल्या झोपेसाठी या गोष्टी गुणकारी ही घटना 18 एप्रिल रोजी घडली. लुईसच्या मृतदेहाचं पोस्ट मॉर्टेम (Post Mortem) करण्यात आलं. त्यावरून डॉक्टर्सनी सांगितलं, की त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांचं भांडण नेमकं कोणत्या कारणावरून झालं, हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. कोर्टात केसची सुनावणी सुरू झाली आहे. तिथे आपली बाजू मांडताना रोक्सानाने सांगितलं, की तिने स्वसंरक्षणासाठी (Self Defence) हे पाऊल उचललं. त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत तिला जामिनावर सोडण्यात आलं आहे. सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्ससाठी एकच चार्जर असावा; EUच्या मागणीवर Apple नाराज कोणत्याही दोन माणसांत वाद किंवा भांडणं होणं नवं नाही, मग ती माणसं एकमेकांचे पती-पत्नी असोत, प्रियकर-प्रेयसी असोत किंवा दोन मित्र किंवा मैत्रिणी असोत. कारण, प्रत्येक माणूस हा स्वतंत्र विचारांचा असतो. एकमेकांशी जुळवून घेत असले, तरी प्रत्येकाची प्रत्येक विषयातली मतं दुसऱ्या व्यक्तीला पटतीलच असं नाही. त्यामुळे भांडणं व्हायचीच; पण प्रत्येकाने स्वतःच्या मनावरचा ताबा ढळून देणं, रागाचा कडेलोट होऊ न देणं आणि समोरच्याच्या मतांचा आदर करणंही किती महत्त्वाचं आहे, हे या उदाहरणावरून कळतं.
  First published: