COVID-19: कोरोनावरची पहिली लस आरोग्य मंत्र्यांनीच घेतली; लोक म्हणाले, मानलं तुम्हाला!

COVID-19: कोरोनावरची पहिली लस आरोग्य मंत्र्यांनीच घेतली; लोक म्हणाले, मानलं तुम्हाला!

जगातल्या श्रीमंत देशांनी आधीच केलं 51 टक्के कोरोना लशीचं बुकिंग केलं असल्याचा खुलासा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

  • Share this:

अबू धाबी 20 सप्टेंबर: संयुक्त अरब अमीरातचे (UAE) आरोग्य मंत्री अब्दुल रहमान बिन मोहम्मद अल ओवैस यांनी कोरोनावरची देशात तयार होत असलेली पहिली लस स्वत:वरच पहिल्यांदा घेतली. UAEमध्ये सध्या या लशीच्या चाचण्या सुरू आहेत. लोकांमधली भीती जावी, कोरोना योद्ध्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी ओवैस यांनी ही लस घेतल्याचं म्हटलं आहे. तर त्यांच्या या कृतीचं लोकांनीही कौतुक केलं असून तुम्हाला मानलं पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

खलीज टाइम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे. क्लिनिकल ट्रायलचे सकारात्मक परिणाम आले असून ही लस पूर्ण सुरक्षित असल्याचा दावाही आरोग्यमंत्र्यांनी केला आहे.

दरम्यान, जगातल्या श्रीमंत देशांनी आधीच केलं 51 टक्के कोरोना लशीचं बुकिंग केलं असल्याचा खुलासा एका  रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. या देशात जगाच्या लोकसंख्येच्या केवळ 13 टक्के लोक राहतात. तर बाकी 2.6 अब्ज लशीचे डोज भारत, बांग्लादेश आणि चीनसारख्या देशांनी बुक केलं आहे. तर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी  सांगितले की पुढील महिन्यात अमेरिका कोरोना लशीचं रोल आऊट करणं सुरू करेल.

भारतात येण्याआधीच रशियन लशीबाबत मोठी माहिती; दिसून आले SIDE EFFECT

सध्या त्यांच्या प्रशासनातील एका प्रमुख आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, 2021 च्या मध्यापर्यंत कोरोनाची लस येऊ शकते. ब्रिटन (Britain) मधील ऑक्सफॅमच्या एका रिपोर्टनुसार काही श्रीमंत देशांनी कोरोना व्हायरसची संभावित लशीचा खुराक आधीपासूनच बुक करुन ठेवला आहे.

COVID: आजींच्या चितेला पुराने दिला वेढा, अखेर माणुसकी जिंकली; मन हेलावणारी घटना

आता जगभरात एकूण संसर्गांची संख्या वाढून 3 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या आता 2 कोटी 17 लाखांहून जास्त झाली आहे. तर कोरोना महासाथीत मृत्यू होणाऱ्यांची संख्या 9 लाख 44 हजारांहून अधिक झाली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 20, 2020, 7:02 PM IST

ताज्या बातम्या