Home /News /videsh /

महिला जेलरचा जडला कैद्यांवर जीव, रात्री गुपचूप जात होती कोठडीत आणि...

महिला जेलरचा जडला कैद्यांवर जीव, रात्री गुपचूप जात होती कोठडीत आणि...


या काळातच जेलर मॅडमनी तुरुंगातल्या तीन कैद्यांसोबत संबंध (Female jailor intimate relationship with prisoners) ठेवले होते.

या काळातच जेलर मॅडमनी तुरुंगातल्या तीन कैद्यांसोबत संबंध (Female jailor intimate relationship with prisoners) ठेवले होते.

या काळातच जेलर मॅडमनी तुरुंगातल्या तीन कैद्यांसोबत संबंध (Female jailor intimate relationship with prisoners) ठेवले होते.

    इंग्लंड, 25 सप्टेंबर : एका महिला जेलरने चक्क तुरुंगातल्या कैद्यांसोबतच संबंध (Lady jailor sex with prisoners) ठेवल्याचा गंभीर प्रकार इंग्लंडमध्ये समोर आला आहे. अगदी खुनाचा आरोप असलेल्या कैद्यांनाही तिने सोडलं नसल्याचं सांगण्यात येत आहे. हे वृत्त सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जगभरातले लोक महिला जेलरच्या (Britain female jailor incident) या कृत्यावर सर्व आश्चर्य व्यक्त करत आहेत. ही घटना इंग्लंडमधल्या नॉर्थ नॉर्दम्पटनशायर (North Northamptonshire) भागात असलेल्या वेलिंगबरो (Wellingborough) शहरातली आहे. या ठिकाणी 32 वर्षांची लाटोया गॉट्रे (Latoya Gautrey) या महिला जेलरने हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे. ऑक्टोबर 2019 ते मार्च 2020 पर्यंत लाटोया मिल्टन कीनिसमधील एचएमपी वुडहिल तुरुंगाच्या जेलर होत्या. त्या वेळी त्यांच्या नियंत्रणाखाली तुरुंगाचा ए-कॅटेगरी भाग होता. या भागात सर्व कुख्यात आणि खतरनाक गुंडांना ठेवण्यात येतं. कुख्यात गुंडांशी ठेवले संबंध या काळातच जेलर मॅडमनी तुरुंगातल्या तीन कैद्यांसोबत संबंध (Female jailor intimate relationship with prisoners) ठेवले होते. दररोज रात्री ही जेलर गुपचुप कैद्यांच्या भागात जात होती आणि काही वेळानंतर परत येत होती. या काळामध्ये तिने खुनाचा गुन्हा सिद्ध झालेल्या (Jailor had sex with murder convicts) दोन कैद्यांसोबतही संबंध ठेवले होते. यात 30 वर्षांचा लीवन ग्रीनफील्ड आणि 24 वर्षांचा तारिक विल्यम्स या दोघांचा समावेश आहे. यासोबतच, ड्रग्ज विक्रीप्रकरणी 6 वर्षांपासून तुरुंगात असणाऱ्या मॉनटेला या कैद्यासोबतही लाटोयाने संबंध (Physical relationship with prisoners) ठेवले होते. हे प्रकरण बाहेर आल्यानंतर तिला तातडीने अटक करण्यात आली होती. तीन मुलांची आई, करायची कैद्यांना ब्लॅकमेल विशेष म्हणजे, लाटोयाचं लग्न झालं आहे आणि तिला तीन मुलंही आहेत. त्यामुळे तिने केलेला प्रकार अधिक धक्कादायक असल्याचं म्हटलं जात आहे. तिने काही वर्षांपूर्वीच आपलं पोलीस प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. तसंच, काही महिन्यांपूर्वीच तिचं तुरुंगामध्ये पोस्टिंग झालं होतं. कोर्टात सुनावणीदरम्यान लाटोयाबाबत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. तिने एका कैद्याचे न्यूड फोटो आपल्या एका साथीदाराला पाठवले होते. या कैद्याला पुढे ब्लॅकमेल (Jailor plan to blackmail prisoner with nudes) करता यावं यासाठी हे फोटो जपून ठेवण्यास तिने आपल्या साथीदाराला सांगितलं होतं. लाटोयाला गेल्या वर्षी मार्च महिन्यात अटक करण्यात आली होती. या वर्षी 21 एप्रिलला तिला शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने तिला 18 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.
    First published:

    पुढील बातम्या