• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • भयावह! पोटाची खळगी भरण्यासाठी बापाने म्हाताऱ्याला विकली 9 वर्षांची लेक

भयावह! पोटाची खळगी भरण्यासाठी बापाने म्हाताऱ्याला विकली 9 वर्षांची लेक

पोट भरण्यासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे घरातील एखाद्या वस्तूप्रमाणे मुलींना विकण्याची वेळ येत आहे.

 • Share this:
  अफगणिस्तान, 4 नोव्हेंबर : कुटुंबाचं पोट भरण्यासाठी घरातील प्रमुख व्यक्तीला बराच त्रास सहन करावा लागतो. ज्या व्यक्तीला एकावेळच जेवण मिळत नाही त्यांनाच याची जाणीव असेल. एक अफगाण व्यक्तीला आपल्या (Afghanistan News) कुटुंबासाठी अन्न खरेदी करण्यासाठी स्वत:च्या मुलीला विकण्याची वेळ आली. या व्यक्तीने आपल्या 9 वर्षांची मुलगी एका 55 वर्षीय व्यक्तीला विकली. अफगणिस्तानमध्ये झालेल्या राजकीय उलथापलथीनंतर येथील परिस्थितीने भीषण रुप घेतलं आहे. पुरेसा रोजगार नसल्यामुळे लोकांनी काय काम करावं आणि हा काय खावं हा मोठा प्रश्न उभा राहिली आहे. दरम्यान अनेक कुटुंबीय पोटाची खळभी भरण्यासाठी मुलीला विकण्याच्या पर्यायाचा अवलंब करीत आहे. (The father sold the 9 year old daughter to the old man to fill his stomach) मुलीचे वडील अब्दुल मलिक यांनी रडत रडत सांगितलं की, आता ही तुमची पत्नी आहे. हिला मारू नका, ही आता तुमची जबाबदारी आहे. हे ही वाचा-मृत्यूच्या 1 तासआधी आईशी शेवटचं बोलली; ऐन दिवाळीत विवाहितेनं उचललं भयावह पाऊल यासंबंधातील एका बातमीत आलेल्या माहितीनुसार, परवानाच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ते अफगणिस्तानातील त्या कुटुंबापैकी एक आहेत ज्यांना मुलींना लग्नाच्या नावावर विकावं लागत आहे. तर अनेक कुटुंबात हिच परिस्थिती आहे. एका 9 सदस्यीय कुटुंब आपली 4 आणि 9 वर्षांच्या मुलीला विकण्याची तयारी करीत आहे. पोट भरण्यासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे घरातील एखाद्या वस्तूप्रमाणे मुलींना विकण्याची वेळ येत आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: