पोर्ट लुईस, 12 ऑगस्ट : मॉरिशसच्या समुद्र किनाऱ्याजवळील एका जहाजातून सातत्याने तेलगळती (Oil Leakage) होत आहे. हे जहाज दोन भागांमध्ये तुटण्याची (Ship Will Break) शक्यता व्यक्त केली जात आहे. जर असं झालं तर हे एक भलमोठं Environmental Disaster ठरू शकतं. मॉरिशसच्या किनाऱ्याजवळ भटकलेलं जहाज दोन भागात तुटू शकतं. एमवी वाकाशियो जापानी कंपनी मित्सुई ओएसके लाइन्स द्वारा संचालित एक कार्गो जहाज आहे. हे जहाज चीनहून ब्राजील जात होतं. मात्र मध्यात 25 जुलै रोजी मोठ्या दगडामध्ये अडकल्यानंतर गुरुवारी जहाजातून समुद्रात तेलगळती सुरू झाली.
आतापर्यंत 1,000 मीट्रिक टन तेलाची गळती
या जहाजातून हिंद महासागराच्या लॅगूनमध्ये तब्बल 1,000 मॅट्रिक टन तेलाची गळती झाली आहे. तज्ज्ञांना भीती आहे की जहाज तुटलं तर पर्यावरणासाठी हा मोठा धोका ठरू शकतो. गुरूवारी तेलगळती सुरू झाल्यानंतर मोठ्या संख्येने सफाई अभियान सुरू करण्यात आलं आहे. ज्यामध्ये हजारो स्थानिक प्रतिनिधी मदत करण्यासाठी मॉरिशनच्या पूर्व भागात येत आहेत.
अद्यापही जहाजात 2,500 मेट्रिक टन तेल आले शिल्लक
ग्रीनपीस इंटरनॅशनलचे माजी रणनीतिकार आणि मॉरिशसमधील संसदेचे माजी सदस्य सुनील डॉवरकासिंग यांनी सांगितले की अद्यापही जहाजाच्या टॅकमध्ये तब्बल 2,500 मॅट्रिक टन इंधन आहे आणि जहाजात तीन टँक आहेत. ज्यातील एक टँकेतून तेलगळती होत आहे. सध्या ही गळती थांबविण्यात आली आहे आणि सध्या दुसरं ऑपरेशन सुरू आहे. ज्यामध्ये जहाज तुटल्यानंतर पहिल्यांदा एक टँकरमधून आणि त्यानंतर इतर टँकमधून तेल बाहेर काढण्यासाठी उपयोग बचाव टीम काम करेल.