नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : कुत्र्याच्या हल्ल्यात (Dog Attack) जखमी झालेल्या कॅलिफॉर्नियाच्या एका मॉडेलला तब्बल 3 कोटी रुपयांचा खर्च करावा लागला. या तरुणीच्या नातेवाईकांच्या एका पिट बुल कुत्र्याने 22 वर्षीय ब्रुकलिन खोरी नावाच्या या मॉडेलचा वरचा ओठ आणि नाकाखालील भागाचा चावा घेतला. यानंतर मॉडेलला भयावह संकटाला सामोरं जावं लागलं.
मॉडेल ब्रुकलिनने सांगितलं की, ही घटना गेल्या वर्षी 3 नोव्हेंबरची आहे. ती कुत्र्यावर प्रेम करीत होती. तिने कुत्र्याच्या डोक्यावरुन हात फिरवताच पिट बुलने (Pit Bull) तरुणीवर हल्ला केला. मॉडेलने सांगितलं की, त्या दिवशी माझ्या करिअरमधील पहिलं टीव्ही जाहिरातीचं शूटिंग होणार होतं. मात्र कुत्र्याच्या या हल्ल्यामुळे तिला ही जाहिरात करता आली नाही. यावेळी ब्रुकलिनला वाटलं की, तिचं करिअर आता संपलं. कारण कुत्र्याच्या हल्ल्यामुळे तिचं नाक आणि ओठ खराब झाले होते.
ब्रुकलिनने सर्जरी करण्यापूर्वी सांगितलं की, मी ठीक होईन यावर माझा विश्वास आहे. सर्जरीनंतर माझी खरी स्माईल पुन्हा येईल. मात्र या जखमेमुळे माझ्या करिअरला जो ब्रेक लागला आहे याचं मला दु:ख आहे.
17 नोव्हेंबर रोजी सर्जरी केल्यानंतर मी माझं तोंड अजिबात हलवू शकत नव्हते. यानंतर मला फिडिंग ट्यूबने खाण्यास देण्यात आलं. त्या काळात मी लिक्विड डाएटवर होते. सर्जरीनंतर मी कित्येक दिवस रुग्णालयातच होते. रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर मंगळवारी तिने स्वत:चा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवरून जारी केला.
हे ही वाचा-Shocking! तरुणीने बेडरूमच्या आत स्वत:च्या Vagina मध्ये घातली गोळी, भीषण अवस्था
ब्रुकलिनने या सर्जरीसाठी तब्बल 3 कोटी रुपये खर्च केले आहेत. यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की, पुढेदेखील तिला सर्जरीची आवश्यकता भासू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.