कोरोना: डॉक्टरांनी सोडली जगण्याची आशा, 81 वर्षांच्या वडिलांना मुलाने मृत्यूच्या तावडीतून सोडवलं

कोरोना: डॉक्टरांनी सोडली जगण्याची आशा, 81 वर्षांच्या वडिलांना मुलाने मृत्यूच्या तावडीतून सोडवलं

  • Share this:

लंडन 03 मे : वय 81 वर्ष. वृद्धत्वामुळे आलेले आजार. त्यात कोरोनाचं नवं संकट आलेलं. डॉक्टर म्हणाले उपचार शक्य नाही. यांना घरी न्या आणि सुखाने मृत्यूला सामोरे जाऊ द्या. पण मुलाने हार मानली नाही. घरीच सेमी हॉस्पिटल तयार करून त्यांने आपल्या वडिलांना मृत्यूच्या तावडीतून सोडवलं. लंडनमध्ये राहणाऱ्या सूर्यकांत नाथवानी आणि त्यांचा मुलगा राज यांच्या जिद्दीची ही प्रेरणादायक कहाणी CNNने दिली आहे.

कोरना व्हायरसचं संकट आल्यानंतर जानेवारीपासून राज यांना आपल्या वडिलांची काळजी वाटू लागली. इटलीतल्या संकटानंतर आणीबाणीच्या काळात उपयोगी पडावं म्हणून वडिलांसाठी अनेक मशिन्स आणि औषध घरीच आणून ठेवली होती. मार्च महिन्यात सूर्यकांत यांना त्रास होऊ लागला. त्यांच्यात कोरोनाची लक्षण दिसू लागली. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासलं आणि यांना आता व्हेंटिलेटर सुद्धा उपयोगी पडणार नाही असं सांगितलं.

हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापेक्षा त्यांना घरीच शांतपणे मृत्यू येऊ द्या असा सल्लाही दिला. राज यांनी डॉक्टरांचा सल्ला मानला आणि वडिलांना घेरी घेऊन आलेत. घरातल्या एका वेगळ्या खोलीत त्यांनी त्यांच्यासाठी छोटं हॉस्पिटलच उभारलं. राज यांना मेडिकलं थोडं फार ज्ञान होतं. गुगल गुरू आणि टेलिमेडसीनचा आधार घेत त्यांनी घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतला.

करदात्यांना आयकर विभागाने पाठवला अलर्ट! होऊ शकतं मोठं नुकसान,वाचा काय आहे प्रकरण

सगळी सुरक्षित साधनं वापरत ते वडिलांवर उपचार करू लागले. व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे डॉक्टर जो सल्ला देत होते त्यानुसार औषधोपचार होत होते. वय जास्त असल्याने प्रकृतीत जास्त चढ उतार होत होते.पण राज यांनी हार मानली नाही. अखेर सूर्यकांत यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली. डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोसळणार संकट, बंगालच्या उपसागरात घोंगावतय वादळ

काही दिवसानंतर ते पूर्ण ठणठणीत बरे झाले. डॉक्टरांनीही ज्यांची आशा सोडली होती ते गृहस्थ केवळ मुलाच्या कठिण परिश्रमाने आणि आत्मविश्वासाने मृत्यूच्या तावडीतून सुटून परत आले.

First published: May 3, 2020, 4:24 PM IST

ताज्या बातम्या